शिवजयंती निमित्याने विविध स्पर्धेचे आयोजन

शिवजयंती निमित्याने विविध स्पर्धेचे आयोजन


प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आज मूल येथे ओम चैतन्यप्रभू बहुउद्देशिय शिक्षण संस्था मूल द्वारा आयोजित निबंध स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलच्या सर्व शाळकरी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

निबंध स्पर्धेमध्ये अ गटामध्ये ( 9 ते 12 ) प्रथम क्रमांक पलक आंनदराव फलके, द्वितीय साहिल शरद भोयर, तृतीय पूजा राजेंद्र ठाकरे तर चित्रकलेमध्ये प्रथम आदित्य प्रवीण मोहूर्ले, द्वितीय सेजल मनोहर गणवीर, तृतीय संतवानी प्रभू संदावार यांनी क्रमांक पटकावला.


तर ब गटामध्ये ( 5 ते 8 ) निबंध स्पर्धेमध्ये प्रथम घनशान गिरीधर भाकरे, द्वितीय सुरभी आंनदराव फलके, तृतीय चैताली अरुण चौकुंडे. चित्रकलेमध्ये प्रथम नंदिनी बंडू भोयर, द्वितीय दिशा संजय तिवाडे, तृतीय आर्थिक रमेश पाठक यांनी क्रमांक पटकावला. 
कार्यक्रमाला अध्यक्ष रत्नमाला प्रभाकर भोयर, प्रमुख पाहुणे जिजाऊ बिग्रेड च्या संजीवनी वाघरे, विद्या बोबाटे यांचे हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण चौधरी, भावना चौखूंडे, कल्पना नरूले, सुनीता वादाफळे, चारूशिला आरेकर यांनी प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!