सावरगाव येथे शांततेत शिवजयंती उत्सव साजरा


 

तलोधी(बा.) (यश कायरकर) 
                 आज दि. 19/2/2021 रोजी 391 व्या शिवजयतीनिमित्त गावातील छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीचे नियोजनातून सावरगाव ग्रामपंचायत येथे शिवजयंती उत्सव शांतता पुर्ण साजरा करण्यात आला. 
                 या शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो ला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करण्यात आले. यावेळी समितीचे सदस्य , ग्रामपंचायत सदस्य व उपस्थित ग्रामस्थांनी शिवाजी महाराजांच्या फोटो ला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करून, हा उत्सव शांतता पुर्ण साजरा करण्यात आला. या शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन समितीचे हितेश मुंगमोडे, महेश बोरकर, चिंटू कालेस्फोर, शुभम पातलेकर, यशवंत कायरकर,सुरज गेडाम,राजू निकूरे, यांनी आयोजित केलेल्या या शिवजयंतीच्या कार्यक्रमात ग्रामपंचायत सरपंच रवी निकूरे, सदस्य युवराज रामटेके, शिवशंकर सहारे, सौ.आशाताई गेडाम, सौ. कविता राऊत,  ग्रामस्थ प्रभाकर बोरकर,निकेश अलोने, सौ.वंदना सोनवाने , तुलुपचंद गेडाम, नाना निकूरे, लोकेश राऊत यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!