अप्पर तालुका तळोधी बाळापूर परिसरातील ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सरशी
अप्पर तालुका तळोधी बाळापूर परिसरातील ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सरशी
तळोधी (बा.) यश कायरकर
तळोधी परिसरातील सहा ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे सरपंच, दोन ठिकाणी बीजेपीचे तर एक ठिकाणी अपक्ष सरपंच्याची निवड.
तळोधी ग्रामपंचायत येथे (बीजेपी) च्या सरपंचपदी सौ. छायाताई मदनकर व उपसरपंचपदी श्री राजेश घिये यांची निवड, वाढोणा ग्रामपंचायत येथे (काँग्रेस) चे सरपंच पदासाठी देवा गेडाम व उपसरपंचपदी भगवान बंसोड यांची निवड, सावरगाव ग्रामपंचायत येथे (काँग्रेस) चे सरपंच रवी निकुरे व उपसरपंचपदी प्रवीण खोब्रागडे यांची निवड करण्यात आली, पळसगाव (खुर्द) ग्रामपंचायत येथे सरपंचपदी (अपक्ष), बालू सिद्धमशेठ्ठीवार व उपसरपंचपदी नरेंद्र गुरनूले यांची निवड झाली तर ओवाळा ग्रामपंचायत येथे (काँग्रेसच्या) सरपंचपदी निशाताई सोनटक्के व उपसरपंचपदी दयाराम गुंतीवार यांची निवड करण्यात आली, तर जनकापुर (पळ.) येथील ग्रामपंचायत येथे (बिजेपी)च्या सरपंच पदासाठी वैशाली गायधने व उपसरपंच पदी महेश रामटेके यांची निवड करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!