मूल येथे मातोश्री रमाई जयंती मोठ्या उत्साहात संपन्न
चंद्रपूर : - मुल तालुक्यातील वार्ड क्र.१४ येशील भिमवाडी महिला कार्यकारिणी वसाहत तर्फे ७ फेब्रुवारीला माता रमाई जयंती निमित्त मसालाभात वितरण व जयंती साजरी करण्यात आली.त्यविळी सर्वप्रथम १०:३० वाजता BSNL OFFICE मागे पंचशील ध्वजाजवळ महिला कार्यकारिनीच्या अध्यक्षा तथा पूरुष कार्यकारिणीचे अध्यक्ष आम्रपाली संघटनेचे प्रसंग तथा संपूर्ण पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहून मातोश्री रमाईना मानवंदना व बुद्ध वंदना अर्पण करण्यात आली. त्यानंतर ४ वाजता मुल येथील बस्टोपनमोर भिमवाडी महिला कार्यकारिणीच्या अध्यक्षा अश्विनीताई रामटेके , उपाध्यक्ष कु.आरती मोटघरे , सचिव स्नेहलताई रामटेके , कोषाध्यक्ष सांचीताई रामटेक तथा पूरुष कार्यकारिणीचे अध्यक्ष विलास बनसोड, सचिव बबन दुर्गे , आम्रणाली संघटनेचे अध्यक्ष संतोषजी रामटेके यांच्या हस्ते सर्वप्रम माता रमाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिपप्रजवलन कार्यक्रम करण्यात आला. व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर माता रमाईचा आदर्श घेऊन मसाले भाताचे वितरण करण्यात आले. मूल शहरातील जनतेने मसाला भाताचा पुरेपुर आनंद घेता, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!