रस्त्याचे जिवघेने काम, विभागाचे दुर्लक्ष
रस्त्याचे जिवघेने काम, विभागाचे दुर्लक्ष
तळोधी (बा.) यश कायरकर.
मिंडाळा,-बाळापुर-,वाढोणा, -पळसगाव (जाट ) या मार्गाच्या कासव गतीने होणाऱ्या कामामुळे नागरिकांना व वाहतूकदारांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे ,
सविस्तर येत्या एक दोन वर्षापासून सुरू असलेल्या या मार्गाचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे, अनियमित व कासवगतीने सुरू आहे . या मार्गावर प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना वर्षभर सतत धुराचा त्रास सहन करावा लागत आहे . सोबतच रस्त्यावर पसरून ठेवलेली काळी गिट्टी ही दोन-दोन महिने तसेच गिट्टी पसरून राहिल्यामुळे त्यावरून दुचाकी वाहन चालवताना वाहने असंतुलित होऊन पडल्याने . रोजच या रस्त्यावर अपघात होत असतात व त्यामध्ये कुणाला किरकोळ जखमा होतात तर कोणाचे हात पाय तुटन्या पर्यंत असे गंभीर अपघात होत असतात. सोबतच सतत या मार्गाने प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना श्वास रोगाचा , खोकल्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत कंत्राटदाराची संपर्क साधला असता त्यांची कळून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत . तर या कासव गतीने व नियमबाह्य होणार या कामाकडे संबंधित बांधकाम विभागाचे ही दुर्लक्ष होत
असल्याचे दिसून येत आहे. याबाबत बांधकाम विभागाची संपर्क साधला असता त्यांचीही कडून कोणतेही उत्तर दिले जात नाही. तरी या रस्त्याचे काम हे योग्य पद्धतीने करण्यात यावे व वाहतूक करणार्यांच्या व्यवस्थेची ही काळजी घेऊन हे लवकरात लवकर काम करण्यात यावे असे परिसरातील लोकांची मागणी आहे.
असल्याचे दिसून येत आहे. याबाबत बांधकाम विभागाची संपर्क साधला असता त्यांचीही कडून कोणतेही उत्तर दिले जात नाही. तरी या रस्त्याचे काम हे योग्य पद्धतीने करण्यात यावे व वाहतूक करणार्यांच्या व्यवस्थेची ही काळजी घेऊन हे लवकरात लवकर काम करण्यात यावे असे परिसरातील लोकांची मागणी आहे.

रस्त्याचे जिवघेने काम, विभागाचे दुर्लक्ष

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!