सामान्यांचे घर बांधण्याचे स्वप्न्र अधुरे
घर बांधकामासाठी रेती उपलब्ध करून देण्याची मागणी
मूल (सौ. मंगला बोरकुटे)
उमा नदी मूल परिसरात आकापूर,महेगाव,चिचाळा,चक देहगाव,नलेश्वर,सुशी दाबगाव,बोरचांदली,उश्राळा चक,राजोली,चितेगाव,येरगाव,भेजगावरेती घाट असले तरी त्या घाटाचा शासनाने लिलाव केला नाही. मात्र दिवसरात्र रेती उपसा होत आहे. ती अवैध रेती अव्वाच्या सव्वा दराने घ्यावी लागत असून महसूल विभागाकडून जप्तीच्या कारवाईचीही भीती असते. जिल्हा प्रशासनाने जे लाभार्थी पंतप्रधान आवास योजना,रमाई आवास योजना जे कोणत्या योजणा असेल त्यांना मंजूरी प्रमाणपत्राच्या आधारे गरजवंताच्या रेती उपलब्ध करून देण्याची मागणी पंतप्रधान आवास योजनातील लाभार्थी यांनी केली आहे.मूल परिसरात,शहरात विविध वार्डातील रोड साठी वाळू मिळत आहे मोठया प्रमाणावर इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकामाकरिता अवैधरित्या रेती अव्वाच्या सव्वा दराने विकत घ्यावी लागत आहे.त्यानंतर रेती स्टाॅक दिसल्याने महसूल विभागाकडून कारवाईची भीती असते. या परिस्थितीमुळे अनेक जण रेती घेत नाही.आता प्रशासनानेच वैद्य मार्गाने रेती उपलब्ध करून द्यावी, अवैद्य उत्खनन प्रकरणात जप्त करण्यात आलेली शेकडो ब्रास रेती ति तरी दयावी अशी मागणी होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!