शंकरपूरच्या सरपंचपदी साईश वारजूकर
शंकरपूर - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
शंकरपूर : - चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात युवा उमेदवार शंकरपुर राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या शंकरपुर येथे सरपंचपदाची निवडणूक झाली त्यात कॉंग्रेस पक्षाने यश मिळवले आहे तर शंकरपूर जिल्हा परिषद अंतर्गत चार ग्रामपंचायत च्या निवडणूक झाली असून एक काँग्रेस तर तीन भाजपा चे सरपंच झाले आहेत या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात कमी वयाचा शंकरपूर चा सरपंच म्हणून साईश सतीश वारजूकर यांची अविरोध निवड झालेली आहे त्यांचे वय 21 वर्ष पाच महिन्याचे असून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात कमी वयाचे सरपंच म्हणून निवडून आले आहे त्यांचे शिक्षण बिझनेस एडमिनिस्ट्रेटिव ची पदवी घेतलेली आहे. तर उपसरपंचपदी अशोक चौधरी यांची निवड करण्यात आलेली आहे मॉडेल ग्रामपंचायत म्हणून समजल्या जाणाऱ्या शंकरपुर ग्रामपंचायतवर मागील 15 वर्षांपासून एक हाती सत्ता असून काँग्रेस गटाचे 13 उमेदवार निवडून आले तर भाजपा गटाचे दोन उमेदवार फक्त निवडून आलेले आहे पांजरेपार ग्रामपंचायत मध्ये भाजपा वैशाली बंगाळे उपसरपंच पदी राहुल गुरपुडे चिंचाला शास्त्री येथे भाजपचे अरविंद राउत उपसरपंच पदी विनायक वासनिक खैरी येथे भाजपचे वसंता रामाजी नरुले उपसरपंच पदी प्रीती विलास गजभे यांची निवड झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!