चिमूर तालूक्यात घाडगे अवैध गौण खनिज उत्खनन चे बादशाहा

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर तालूक्यात मागील दहा वर्षा पासुन अवैध रित्या रेती,गिट्टी व मुरूमाचे गौण खनिज उत्खननाचे घाडगे हे जणू बादशाहाच दिसुन येत आहे.अवैध गौण खनिज उत्खनन  हे खुले आम करीत आहे.महसुल विभागाला आपल्या खिश्यात घेऊन चालीत आहे.म्हणूननच आज पर्यंत कोणत्याही अवैध उत्खननात तहसील मध्ये कुठल्याही गाड्या लागलेल्या नाही. आणि आजही चिमुर तालूक्यात येत असलेल्या कसार बोडी पाहळी ची गिट्टी, बोल्डर खुले आम विना परवानगी काढणे  सुरू आहे.तर बोधडा नदी पात्रातुन खुले आम रेती तस्करी सुद्धा जोमाने सुरू आहे.आणि मुरमाचे उत्खनन तर बारा ही महीने सुरूच असते.याला पुर्ण पने सहकार्य महसुल विभागाच्या अधिकारी यांचेकडून मिळत आहे.घाडगे यांच्या अवैध उत्खननावर आता पर्यंत कोणतीही मोठी कार्यवाही झाली नाही.आणि त्याचबरोबर चिमूर पासून १० किमी अंतरावर असलेल्या जांभुळघाट येथे ग्राम पंचायत रोड च्या जागेवर घाडगे हे मकानाचे बांधकाम करीत असताना ग्राम पंचायत द्वारे काम बंद करण्याचे नोटीस पाठविण्यात आले होते.पण नोटीसाला न जुमानता केराची टोपली दाखवत तहसील मधून घराचे बांधकाम करण्याची परवानगी आणली.खर तर तहसील दाराने रोडच्या जाग्याची परवानगी दिली कसी आज तळ्यातील चार प्लॉट च्या जागेवर शुध्दा अतीक्रमन केल्याचे दिसुन येत आहे.या वरून असे दिसुन येते कि महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांचा मोठा हात आणि आर्शिवाद लक्ष्मण घाडगे यांच्या डोक्यावर आहे.आज करोडो रुपयांची संपती असुन सुध्दा खुलेआम राज्य महामार्गावर दोन्ही बाजुला घर व शासनाच्या जागेवर कब्जा केल्याचे दैनंदिन दिसून येत आहे. मागील दहा वर्षा पासुन  अवैध गौण खनिज चे उत्खनन करीत आहे. चिमुर तालूक्यात अवैध गौण खनीजाचे बादशाहाच आहे असे दिसून येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!