जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या पत्राला ब्रम्हपुरी तालुक्यातील आधारभूत धान खरेदी केंद्राकडून तिलांजली.कॉ.झोडगे यांचा आरोप

तालुका - प्रतिनिधी ( रोशन येवले )

राजुरा : - जिल्हा मार्केटिंग अधिकारी ए.आर. गोगीरवार यांनी दिनांक 18/12/2020 ला 2020-21 मधील आधारभूत किमत खरेदी योजने अंतर्गत शेतकऱ्याचे धान कश्या प्रकारे घेण्यात येईल या करिता एक पत्र काढून धान खरेदी बाबत सर्व नियम व अटी सह सर्व धान खरेदी संस्थाना स्पष्ट सूचना दिल्या की, धान खरेदी करताना बारदाण्याच्या वजना एवढेच धान खरेदी करावे वजना पेक्षा जास्त धान खरेदी केल्या जाऊ नये म्हणजे एका बारदाण्यास एकच बारदाण्याचे वजन घ्यावे परंतु खरेदीदार संस्था दोन बारदाण्याचे वजन शेतकऱ्यांकडून घेतात, त्याचप्रमाणे ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी केलेल्या नोंदणीप्रमाणे शेतकऱ्यांना एस. एम. एस. देऊनच धान खरेदी करण्यात यावे परंतु ब्रम्हपुरी तालुक्यात कोणत्याही पोर्टलची लिंक पब्लिश न करता  शेतकऱ्याचे सात बारा बाजार समिती कडून गोळा करण्यात आले व सांगण्यात आले की तुमचा नंबर आल्यावर तुम्हाला कॉल येईल मग तुम्ही धान घेऊन येणे त्या प्रमाणे शेतकरी कॉल ची वाट पहात बसले आणि आता शेतकरी आमचा नंबर अजूनही का आला नाही म्हणून चौकशी करायला गेले तर त्यांना बाजारसमितीचे अधिकारी तसेच खरेदी संस्थेचे ग्रेडर व संबंधित कर्मचारी आता जो धान आणलं त्याचे धान मोजणी चालू झाले टोकन नुसार घेणे बंद झाले असे सांगतात तर जिल्हा मार्केटिंग ऑफिसर कडे विचारणा केली टोकन नुसार धान खरेदी करण्यात येत आहे असे सांगतात त्याचप्रमाणे धान खरेदी ही  इलेक्ट्रिक काट्यानेच करावी खडा काटा करू नये अश्या लेखी सूचना दिल्या आहेत परंतु कोणत्याही खरेदी केंद्रावर इलेक्ट्रिक काट्याचा वापर केल्या जात नाही खड्या काट्यात शेतकऱ्यांना क्विंटल मागे 2 ते तीन किलोने लुबाडता येते...... 
    शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये, शेतकऱ्याची लुबाडून होऊ नये या करिता जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यात तहसीलदार यांच्या अध्यक्षते खाली एक समिती स्थापन केली आहे परंतु ब्रम्हपुरी तालुक्यातील ही समिती सुद्धा निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे. 
 याचं तालुक्यातील याचं विधान संभाक्षेत्राचे आमदार हे जिल्ह्याचे पालक मंत्री आहेत ते सुद्धा तसेच निवडणुकी मध्ये आमच हात शेतकऱ्यांचे साथ म्हणून मोठमोठ्या घोषणा देणारे शेतकरी नेते सुद्धा मूग गिळून चूप आहेत. 

       त्यामुळे आधारभूत किंमत धान खरेदी केंद्रांना घालून दिलेल्या नियम व अटी धाब्यावर मांडून ब्रम्हपुरी तालुक्यातील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय करीत आहेत. जिल्हा मार्केटिंग अधिकारी तसेच समितिचे अध्यक्ष या नात्याने मा. तहसीलदार ब्रम्हपुरी यांनी त्वरित धान खरेदी मध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांचे टोकन प्रमाणे शेतकऱ्यांना माहिती देऊन तसेच एका पोत्यास एक पोत्याचेच वजन व इलेक्ट्रिक काट्यानेच धान खरेदी करावी व आपल्या मनमानी प्रमाणे  धान खरेदी करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या  संस्था व ग्रेड रवर तातडीने  कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य कौन्सिल सदक्ष कॉ विनोद झोडगे यांनी केली आणि दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी पत्रकाद्वारे दिला आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!