नेरी वनविभागाच्या क्षेत्र सहाय्यकाला निलंबित करा - शिवनपायली येथील गावकऱ्यांची मागणी

खोटे छायाचित्र दाखवून वृत्त प्रसारित करून  प्रकरण दडपण्याचा प्रयन्त

शंकरपूर - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

शंकरपूर : - चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या बोळधा येथील शिवनपायली गावाला लागून असलेले मिश्र रोपवन दि.16 फेब्रुवारी ला आग लागून जळुन खाक झाले वनमजुरांच्या निष्काळजीपणा मुळे हे संपुर्ण रोपवन जळुन भस्म झाले मात्र नेरी येथील क्षेत्र सहायकाने या रोपवणातील उंच गवत आणि कचरा झुडपे जळले रोप जळले नाही अशी प्रतिक्रिया दिली आणि काही वृत्तपत्रात खोटे छायाचित्रे देऊन वृत्त प्रसारित करून हे संपुर्ण आगग्रस्त रोपवन प्रकरण दडपण्याचा आणि वनविभागाचे दिशाभुल करण्याचा प्रकार केला आहे त्यामुळे स्वतः घटनास्थळी उपस्थित असलेल्या साक्षीदार आणि गावकऱ्यांनी क्षेत्र सहायकला निलंबित करण्याची मागणी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
       सदर रोपवन हे 20 हेक्टर जागेवर 22 हजार रोपे सण 2019 ला लावण्यात आले होते सुंदर असे रोपवन तयार होऊन सर्व रोपे जगून हिरवीगार झाली होती परंतू 16 फ्रेब्रु ला  आगीत जळुन भस्म झाले आग ही वन मजुरांनी साईड जाळण्यासाठी लावली होती आणि मजूर त्या दिवशी कामावर होते ही माहिती क्षेत्र सहाय्यक अधिकारी ला माहिती असूनही त्यांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली आणि चौकशी सुरू आहे असे सांगितले परंतु प्रत्यक्षात मात्र गावकऱ्यांनी घटनास्थळी आग लागल्यावर वन मजुरांना आग विजवताना बघितले त्यामुळे इथे अज्ञात इसम आलाच कुठून असा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे चोर सोडून संन्याशाला फासावर लावण्याचा प्रकार होत आहे असे सर्व प्रकार या क्षेत्राचे  वन क्षेत्र साहाय्यक अधिकारी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप शिवनपायली येथील गावकऱ्यांनी केला आहे त्यामुळे संबधीत विभागाने क्षेत्र सहायकाला निलंबित करून या प्रकरणाची  तात्काळ चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे
-------------------------------------------
प्रतिक्रिया 
सदर प्रकरणाची दोन ते तीन दिवसात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल वन परिक्षेत्र अधिकारी गायकवाड साहेब तळोधी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!