संजय राठोड यांचा राजीनामा
संजय राठोड यांचा राजीनामा
मुंबई (पब्लिक मिडिया)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा राजीनामा स्विकारले आहे.
संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपाने राज्यभर आंदोलन सुरू केले होते. राजीनामा दिल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही अशी धमकीही दिली होती या पार्श्वभूमीवर हा राजीनामा घेण्यात आला आहे.
परळी येथील पूजा चव्हाण नामक युवतीने पुणे येथे आत्महत्या केली. आत्महत्येप्रकरणी बारा ऑडिओ वायरल झालेल्या होत्या. त्यातील आवाज मंत्री संजय राठोड चा असल्याचा आरोप झाला. या प्रकरणात संजय राठोड यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला. त्यांच्या विरोधात राजकीय वातावरण तयार झाले.
राज्यात करोना वाढत असल्याने सामाजिक राजकीय धार्मिक कार्यक्रमावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंदी घातली आहे. मात्र त्यांच्याच पक्षाचे मंत्री संजय राठोड यांनी पोहरागड येथे मोठी गर्दी जमा होऊन मुख्यमंत्र्यांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. समाजाची गर्दी जमवून नामदार राठोड यांनी नाराजी ओढवून घेतली होती अशीही चर्चा आहे.
माध्यमांशी बोलताना राठोड यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!