रस्त्यावर भगदाड ! अपघाताची शक्यता
रस्त्यावर भगदाड ! अपघाताची शक्यता
शंकरपूर...
नेरी येथील वार्ड क्र.4 मधील ऐन जाण्या-येण्याच्या मार्गावर मोठे भगदाड पडलेले असल्याने ते अपघातास कारणीभूत ठरत आहेत.अनेकदा ग्रा प कार्यालयात माहिती सूचना करूनही या बाबीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे
मागील कित्येक महिन्यापासून वार्ड क्र 4 मधील सिरपूर रोड कडून बौद्ध विहाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे भगदाड पडलेले असल्यांने ते भगदाडाने मोठ्या प्रमाणात अपघातास निमंत्रण देत असून अनेक अपघात सुद्धा झालेले आसतानाही मात्र ग्रा प प्रशासन या बाबीकडे लक्ष देत नाही त्यामुळे नागरिकांत नाराजी दिसत आहे.
या रस्त्यावरील भगदाडाबद्दल अनेकवेळा ग्राम पंचायत प्रशासनाला दिवाकर वाघे यांनी माहिती दिली मात्र अजूनपर्यंत काहीच कारवाही होत नसल्याने नागरिकांचा जीव गेल्यावर रस्त्याची दुरूस्ती होणार का असे नागरिकांकडून विचारल्या जात असून लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!