अपघातात युवकाचा मृत्यू....
अपघातात युवकाचा मृत्यू..........
शंकरपूर (जगदिश पेंदाम) येथून जवळच असलेल्या जवराबोडी रस्त्यावर दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला आहे ही घटना बुधवारी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान घडलेली आहे पुरुषोत्तम फकीराचंद धाडसे वय 30 वर्ष असे मृतक युवकाचे नाव असून हा नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील रहिवासी आहे हा व्यक्ती शंकरपूर येथील चुलत भावाकडे स्वतःच्या दुचाकीने जेवणाच्या कार्यक्रमाला आला होता जेवण आटपून भिवापूर येथे परत जात असताना जवराबोडी रस्त्यावरील गोसेखुर्द नहर पुलियाजवळ हा अपघात झाला आहे नेमका हा अपघात दुचाकीवरून पडल्याने झाला ही कोणत्या दुसऱ्या वाहनाने येऊन याला टक्कर मारले हे अजून पर्यंत माहिती झाली नाही शंकरपूर येथील तीन युवक भिवापूर येथून परत येत असताना मृतक रस्त्याच्या बाजूला पडून दिसला त्यांनी लगेच याची माहिती पोलीस चौकी ला दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. शवविच्छेदन भिवापूर येथे करण्यात आले असून शंकरपूर पोलिस चौकीत गुन्हा नोंद केला आहे अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे करीत आहे मृतकाचे लग्न झाले असून तीन वर्षांची मुलगी आहे...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!