सावरगाव येथे जनावरांचे वंध्यत्व व रोगनिदान शिबीर

सावरगाव येथे जनावरांचे वंध्यत्व व रोगनिदान शिबीर


तळोधी(बा.)(यश कायरकर) 
            तळोधी अप्पर तालुका परिसरातील सावरगाव येथे पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती नागभीड , जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या वतीने  पंचायत समिती सेस फंड  योजना अंतर्गत जनावरांचे वंध्यत्व निदान व उपचार शिबिर सावरगाव येथे . मंगळवार ला 23 फेब्रुवारी  वारजुरकर ग्राउंड येथे आयोजन करण्यात आले. शिबिराचा लाभ घेण्याकरिता सावरगाव येथील शेतकरी व पशुपालकांनी घेत   त्यांनी  त्यांच्या 150 जनावरांना या शिबिरात  आरोग्य तपासणी करिता आणण्यात आले होते.  त्यापैकी वंध्यत्व तपासणीकरिता 30 जनावरे, गर्भधारणा तपासणीकरिता 40 जनावरे, व किरकोळ आरोग्य आरोग्य तपासणी करिता 80 जनावरे असे एकूण 150 जनावरांची या शिबिरात  आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात लाभ घेतलेल्या पाळीव जनावरांच्या मालकांना  इतर लागवटी रोग, व वंध्यत्व, गर्भधारणा या विषयावर मार्गदर्शनही करण्यात आले.
             या शिबिरा करिता उद्घाटक , श्रीमती नयना ताई गेडाम सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर .  अध्यक्ष, श्री प्रफुल्ल जी खापर्डे सभापती पंचायत समिती नागभीड. तथा प्रमुख उपस्थिती श्रीमती रागिनी ताई घोरपडे, उपसभापती पंचायत समिती नागभीड.  श्यामसुंदर पूरकाम, पंचायत समिती नागभीड.  श्रीमती प्रणाली ताई खोचरे , गट विकास अधिकारी पंचायत समिती नागभीड. श्री संजय जी पुरी सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती नागभीड. रविंद्रजी निकूरे , सरपंच ग्रामपंचायत सावरगाव. श्री प्रवीण खोबरागडे उपसरपंच ग्रामपंचायत सावरगाव . तथा समस्त गावातील शेतकरी व पशुपालन यांची उपस्थिती होती . तर या शिबिरात आरोग्य तपासणी अधिकारी प्रमुख श्री डॉक्टर श्री गिरीश गबने,  पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती नागभीड . श्री  वाय.एस. वाघरे पशुधन पर्यवेक्षक पशुवैद्यकीय दवाखाना वाढोणा तथा अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी शेतकऱ्यांच्या पाडी जनावरांची तपासणी व मार्गदर्शन या शिबिरामध्ये केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!