खाजगी बसेससच कोरोना covid-19 प्रसाराचे मुख्य वाहक नाही का ? वाहतूक नियंत्रण विभाग, पोलीस का करतात डोळेझाक ?
खाजगी बसेससच कोरोना covid-19 प्रसाराचे मुख्य वाहक नाही का ?
वाहतूक नियंत्रण विभाग, पोलीस का करतात डोळेझाक ?
तळोधी (बा.) (यश कायरकर)
संपूर्ण जगाने कोरोना covid-19 महामारी चे विशाल रूप पाहिले. आपल्या भारताने भोगले पण आहे. यात रोजगारांचे रोजगारही हिरावले, व्यवसायिक यांचे व्यवसाय बंद झाले, विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत झाले, आणि शासनाचे अर्थ संकटही वाढले, आणि आत्ताच थोडी राहत मिळालीच की, पुन्हा कोरोना चा come back झाला आणि शासन पुन्हा ऍक्शन मोडमध्ये आला. मात्र नव्याने कोरोना पुन्हा पाय पसरत असताना दुचाकीस्वार , रस्त्याने चालणारे आणि गावात, शहरात वावरणारे यांच्यावर मास्क वापरण्याचे निर्बंध शासनाने लादले आहे.
या निर्बंधाचा फायदा घेत पोलीस विभाग तर दुचाकीस्वार कडून मास्क न वापरल्यास दोनशे 200 रुपयाची पावती घेतात, दंड आकारतात सुद्धा. मात्र दुसरीकडे खासगी बसेस ज्यांना काही नियम व अटी लादून सुरू करण्यात आले. मात्र यांना प्रत्येक्षात रस्त्यावर कुठलेही निर्बंध नाही. आणि पोलीसांना त्यांच्याकडे बघायला वेळही नाही. खरंच प्रवाशांची ने-आण करताना, ते खाजगी बसेस त्या नियमांचे पालन करत आहेत का ? याकडे लक्ष द्यायला पोलीस विभाग व वाहतूक नियंत्रण विभाग यांच्याकडे थोडीही वेळ का नाही ? रस्त्यावर चालत असताना दुचाकीस्वारानी तोंडावर मास्क घातलं नाही आहे. किंवा दोन ऐवजी तिसरी व्यक्ती बसवलेली आहे म्हणून दंड ठोकले जाते. मात्र त्याच काळात तिथूनच ट्रॅव्हल्सची 32 प्रवाशांची क्षमता असताना 100 प्रवासी भरून खाजगी वाहतुकीची बस जात असते परंतु त्याकडे डोळेझाक केले जाते.
जर दुचाकीस्वाराचा कींवा रस्त्याने पायदळ जाणाऱ्या माणसाने मास्क न वापरल्याने कोरोना चा प्रसार होत असेल. तर खासगी बसेस मध्ये प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांपैकी 80% टक्के प्रवासी मास्क लावलेले नसतातच. त्यातून खरंच कोरोणा चा प्रसार होत नाही का ? किंवा ही बाजू कोणत्याही अधिकार्यांना दिसत नाही का.?
एकीकडे प्रवासाचा मुख्य साधन असलेली रेल्वेसेवा केंद्र शासनाने बंद ठेवली आहे. महा मंडळाच्या बसेस मध्ये निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र खाजगी वाहतूक करणार्या बसेसमध्ये कुठलेही निर्बंध का नाही ? क्षमतेच्या दुप्पटीने प्रवासी भरले जातात . कोरोना चा उद्रेक होत असताना, लहान मुलांना, वृध्द व्यक्तींना प्रवासाला बंधन असुनही या बसेस मध्ये त्यांना जनावरांप्रमाने कोंबुन भरले जातात. काही प्रवासी आजारीही असतात, बहुतेक प्रवासी तोंडावर मास्क ही वापरत नाही. या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे, पोलीस विभागाचे थोडेही लक्ष नाही.
याकडे शासनाने लक्ष द्यावे. व खाजगी बसेस वर निर्बंध लावावे. एक तर त्यांना नियमांचे पालन करायला लावावे. अन्यथा खाजगी बसेस बंद करण्यात याव्यात अशी मागणी काही लोकांनी केलेली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!