पळसगाव (जाट) ग्रामपंचायतीवर पुन्हा भाजपचीच पकड
पळसगाव (जाट) ग्रामपंचायतीवर पुन्हा भाजपचीच पकड
सिंदेवाही (शशिकांत बदकमवार)
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सिंदेवाही तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या पळसगाव (जाट)च्या तेरा सदस्यीय ग्रामपंचायतीत काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य निवडून आले असतानाही काँग्रेसला सरपंच पदापासून अलिप्त राहण्याची वेळ आली.
आज दि. १२ फेब्रुवारीला ग्रा.पं. पळसगाव (जाट)च्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. नवनियुक्त सदस्यांमध्ये काँग्रेसचे अधिकृत सहा, बंडखोर दोन, तर भाजपचे पाच सदस्य निवडून आले होते. बहुमत मिळाले म्हणून काँग्रेसने जल्लोषही केला होता. मात्र सरपंच पदाच्या निवडप्रक्रियेत बंडखोर काँग्रेस सदस्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने काँग्रेसचे सरपंचपदाचे मनसुबे धुळीस मिळाले, तर भाजपने पुन्हा सत्तेवर आपली पकड कायम ठेवली.
काँग्रेसविरूद्ध बंडखोरी करून अपक्ष निवडून आलेले श्री. जगदीश कामडी व श्री. रमेश बनकर यांनी सरपंचनिवडीत भाजपसोबत हातमिळवणी केली. काँग्रेसच्या सौ. प्रियंका अलमस्त यांचा पराभव करून श्री. जगदीश कामडी भाजपसमर्थित सरपंच म्हणून निवडून आले; तर भाजपचे श्री. संतोष गायकवाड यांनी काँग्रेसच्या श्री. सचिन सहारे यांना पराभूत करून उपसरपंचपदावर ताबा मिळवला.
पुन्हा एकदा भाजपकडेच सत्तेची सूत्रे आल्याने 'कही खुशी, कही गम' असे चित्र पहावयास मिळत आहे.
श्री. रितेशजी अलमस्त, संजय हटकर, देवराव कोठेवार, निरंदासजी पाकमोडे, अब्दुल हक शेख, डॉ. आनंद लांजेवार आदींनी या सत्तासमीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रामवासियांतर्फे नवनियुक्त सरपंच, उपसरपंचांचे अभिनंदन करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!