पूजा चव्हाण प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचेवर गुन्हा दाखल करा.
पूजा चव्हाण प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचेवर गुन्हा दाखल करा.
भाजपाच्या चित्रा वाघ यांची मागणी
मुंबई (पब्लिक मिडिया)
पुणे येथे पूजा चव्हाण या युवतीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचे वर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.
मूळची परळी (बीड) येथील रहिवासी पुजा चव्हाण यांनी पुणे येथे आत्महत्या केली ही आत्महत्या विदर्भातल्या मंत्र्यांशी असलेल्या संबंधातून झाल्याची दोन दिवसापासून चर्चा सुरू होती. आज 11 ऑडिओ व्हायरल झाल्याने आणि या वायरल आवाजामध्ये मंत्री संजय राठोड यांचा आवाज असल्याने, पहिल्यांदाच संजय राठोड यांचा नाव पुढे आले आहे. संजय राठोड हे दारव्हा येथील शिवसेनेचे आमदार असून सध्या वनमंत्री आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!