विहिरगाव ग्राम पंचायत सरपंच पदी शीतल प्रवीण मुंढरे यांची बिनविरोध निवड
उपसरपंच पदी,मधुकर देविदास गजभिये यांची बिनविरोध निवड
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगांव (पि) : - दिनांक १२/२/२०२१ ला चिमूर तालुक्यातील विहिरगाव ग्राम ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी महिला काँग्रेसचे युवा कार्यकर्ते शीतल प्रवीण मुंढरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर उपसरपंच पदी मधुकर देविदास गजभिये यांची सुध्दा बिनविरोध निवड करण्यात आली.७ सदस्य संख्या असलेल्या विहिरगाव ग्रामपंचायतीत ६ सदस्य कांग्रेस पक्षाचे डॉ.रहमान पठाण सुधीर राऊत यांच्या विचारसरणीचे असून. नवनिर्वाचित सदस्य मध्ये शीतल मुंढरे,मधुकर गजभिये,विकास बारेकर,संजय मडावी,छाया ननावरे,मीनाक्षी बावणे,निवडणूक अद्यासी अधिकारी म्हुणून रामचंद्र पाटील (मंडळ अधिकरी महसूल)नौतांम ग्रामसेवक,ग्राम पंचायत कर्मचारी निवडीमुळे गावातील कार्यकर्ते गौतम मेश्राम,मधुकर दांडेकर,महादेव मडावी,हिरामण मडावी,सुरेश ढोणे,विठ्ठल ननावरे,गोविंदराव चन्ने ,रतिराम धाडसे,अनिल गोंडाने, महेंद्र भीमटे,यांनी त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!