स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या २६ फेब्रुवारीला असलेल्या स्मृतीदिन
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या २६ फेब्रुवारीला असलेल्या स्मृतीदिन
मातृभूमीच्या मुक्ततेसाठी प्रत्येक आघाडीवर सदैव प्रथम क्रमांक भूषवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !
१. मातृभूमीचा जयघोष केला; म्हणून ब्रिटीश सरकारचे अनुदान मिळत असलेल्या महाविद्यालयाच्या वसतीगृहातून काढून टाकलेले सावरकर हेच ‘पहिले भारतीय विद्यार्थी’ होत.
२. लोकमान्य टिळक, शि.म. परांजपे इत्यादींच्या साक्षीने पुण्यात सार्वजनिक रीतीने परदेशी कपड्यांची प्रचंड होळी करणारे सावरकर हे ‘पहिले भारतीय पुढारी !’
३. ज्या काळात ‘राज्य ’ किंवा ‘स्वराज्य’ हा केवळ शब्द उच्चारला, तरी त्याच्यावर सर्वस्व हानीचे संकट ओढवत असे, त्या काळात ‘संपूर्ण राजकीय स्वातंत्र्य हे भारताचे उद्दिष्ट आहे’, असे प्रखरपणे उद्घोषित करणारे सावरकर हेच ‘आद्य राजकीय नेते’ होत.
४. विशिष्ट राजकीय विचारसरणी व्यक्त केली; म्हणून ब्रिटीश सरकारने ‘बॅरिस्टर’ ही पदवी देण्यास ज्यांना नकार दिला, असे सावरकर हे ‘पहिले बॅरिस्टर !’
५. देशभक्ती दाखवली; म्हणून एका भारतीय विद्यापिठाने ज्यांची पदवी काढून घेतली, असे सावरकर हे ‘पहिले पदवीधर !’
६. भारतीय स्वातंत्र्याच्या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय महत्त्व मिळवून देणारे सावरकर हेच ‘पहिले भारतीय पदवीधर नागरीक !’
७. ज्यांचा ग्रंथ छापण्यापूर्वीच किंवा प्रकाशित होण्यापूर्वीच दोन राष्ट्रांच्या शासनांनी तो जप्त करून त्या ग्रंथाला जागतिक साहित्याच्या क्षेत्रात एक अजोड बहुमान मिळवून दिला, असे सावरकर हेच ‘पहिले ग्रंथकार !’
८. ब्रिटीश न्यायालयाचा अधिकार अमान्य करणारे सावरकर हे ‘पहिले बंडखोर भारतीय नेते !’
९. जगाच्या संपूर्ण इतिहासात सावरकर हे ‘पहिले राजकीय बंदीवान !’ (हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात ज्यांच्या अटकेच्या प्रश्नावर अटीतटीचे रण माजले, असे सावरकर हेच ‘जगाच्या इतिहासातले पहिले राजकीय बंदीवान’ होत.)
१०. कागद-लेखणी ही साधने उपलब्ध नसतांना कारागृहाच्या भिंतीवर घायपात्याच्या काट्याने ‘कमला’ सारखे नितांत सुंदर काव्य लिहिणारे आणि त्या सहस्रावधी काव्यपंक्ती वैदिक चिकाटीने स्मृतीगत करून ठेवून नंतर इतरांच्या मुखाने भारतात प्रस्तुत करणारे ‘जगाच्या इतिहासातले पहिले महाकवी !’
११. केवळ योगी पुरुषांनाच शोभेल अशा पद्धतीने स्वेच्छेने मृत्यूस सामोरे जाणारे, आत्मसमर्पण करणारे सावरकर हेच ‘एकमेव पहिले सशस्त्र क्रांतीकारक !’
१२. वयाच्या १५ व्या वर्षीच स्वातंत्र्यासाठी सावरकर हेच ‘सशस्त्र क्रांतीची शपथ घेणारे पहिले क्रांतीवीर !’
१३. दोन जन्मठेपांची अमानुष शिक्षा देण्यात आलेले आणि ‘हे सरकार तरी ५० वर्षे टिकणार आहे का ?’, असे इंग्रजांना आव्हान देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हेच ‘पहिले भारतीय पुढारी !’
१४. जन्मठेपेेच्या बंदीतही हिंदु धर्माची हानी थांबवण्यासाठी शुद्धीचा पाया घालणारे पहिले धर्मवीर आणि रत्नागिरीच्या स्थानबद्धतेच्या काळात अस्पृश्यता निर्मूलनाचे महान कार्य करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे ‘पहिले समाजसुधारक !’
१५. हिंदु तत्त्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाची शास्त्रशुद्ध आणि अव्याप्ती अन् अतिव्याप्ती यांपासून मुक्त असलेली व्याख्या करणारे ‘पहिले तत्त्वज्ञ !’ (नेहरूंच्या भारत सरकारने ‘हिंदु कोड बिला’त हीच व्याख्या स्वीकारली आहे.)
१६. फाळणीचा धोका १७ वर्षे आधीच सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे पहिले ‘द्रष्टे महापुरुष’ होत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!