करोड रूपयाच्या बसस्थानकावर पाण्यासाठी भटकंती

करोड रूपयाच्या बसस्थानकावर पाण्यासाठी भटकंती


मूल (अमित राऊत)
   
       शहरात मुल—बल्लारपुर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे पुढाकारातुन करोड रूपयाचा बसस्थानकाचे बांधकाम करण्यात आले. मात्र बांधकाम अद्यापही पुर्णत्वास आले नाही.करोड रूपयाचे बांधकाम होत आहे, बसस्थानक सुरू झाले आहे. मात्र बसस्थानकात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मूल बस स्थानकात दिवसभर प्रवाशांची रेलचेल असते.नागपूर,गडचिरोली,ब्रम्हपूरी,चंद्रपूर तसेच ग्रामिण भागातील प्रवासी आणि शाळेचे विद्यार्थी प्रवास करीत असतात. सद्या उन्हाळा लागला असल्याने पाण्याची नितांत गरत भासते.  प्रवासी आपली तहान भागविण्याकरीता बस स्थानकावर पिण्याचे पाणी शोधावे लागत आहे.
       प्रवासी स्थानकावर बस थांबताच नळावर आपली बॉटल भरण्याकरीता जातात. परंतु,त्या ठिकाणी नळाला पाणीच नसल्याने त्यांची निराशा होताना दिसत आहे.
   बस स्थानकावर वॉटर फिल्टर बंद आहे. खेडयांतून अनेक वृध्द प्रवासी येतात. संबंधीत विभागाने याकडे लक्ष देऊन प्रवाशांची गैरसोय टाळावी आणि त्यांना पिण्याचे स्वच्छ शुध्द पाणी उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!