वरातीचा ट्रक उलटला -चार जागीच ठार


वरातीचा ट्रक उलटला चाार जण जागीच ठार


सिंदेवाही (शशिकांत बतकमवार)
             एकारा भुज येथील वरात रत्नापुरला लग्न आटपून परतीच्या प्रवासाला निघाले असताना कच्चेपार नर्सरी जवळ चालकाचा वाहना वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक झाडाला आदळून पलटी होऊन ४ जण जागीच ठार झाले तर 25 जण जखमी असून त्यातील 1गंभीर जखमी आहे
सविस्तर माहिती अशी की जगदीश लोंढे यांच्या मुलीचे लग्न एकारा येथील एकनाथ अरसोडे यांच्या मुला सोबत १०:३० वा. लग्न सोहळा पार पडला.
                       जेवण आटपून परतीच्या प्रवासाला निघाले असता कच्चेपार नर्सरी जवळ चालक मद्यप्राशन केल्या असल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून, झाडाला आदळून ट्रक पलटी झाले असता २ महिला कविता संजय बोरकर वय ३५ वर्ष रा. आमगाव, लीना घनश्याम गहाने वय २६ वर्ष रा. शिवपायली व २ पुरुष रघुनाथ कोराम वय ४१ वर्ष रा. एकारा भुज, साहिल विनोद कोराम वय १४ वर्ष रा. एकारा भुज हे चार व्यक्ती जागीच  ठार झाले तर २५ जन जखमी झाले . 
         अपघाता स्थळी गाडीखाली दबलेल्या डेथ बॉडी काढण्यासाठी जेसीपी मशीन लावण्यात आली 
अपघाता स्थळी नातेवाईकांचा  रडण्याचा टाहो फुटला होता.  जखमीना ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे तात्काळ भरती करण्यात आले. त्यातील एक गंभीर जखमी होता. तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी  तहसीलदार गणेश जगदाळे तहसील कार्यालय सिंदेवाही, पोलीस निरीक्षक योगेश घारे पोलीस स्टेशन सिंदेवाही घटनास्थळी उपस्थित होते.अधिक तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत
 


अंजली घनशाम गहाणे ही लहानगी मुलगी या भीषण अपघातात वाचली. मात्र तिची आई लीना जागीच ठार झाली.
 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!