आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकरी यांना कर्जमाफी मिळावी यासाठी सहकार विभागास दिले पत्र.
शासनाची कर्जमाफी योजना मात्र अद्यापही पात्र शेतकरी यांना लाभ मिळाला नाही. याबाबतचे निवेदनावर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्वरीत सहकार विभाग यांना पत्र दिले.
🔹 श्री. करण (बंङू) गौरकार यांनी तोहगाव परिसरातील शेतकरी यांचे वतीने निवेदन दिले होते.
याबाबत सविस्तर ... श्री. बंङु गौरकार यांनी तोहगाव परिसरातील ५४ शेतकरी हे तोहगाव सेवा सहकारी संस्थेचे सभासद असुन ते कर्जमाफी योजनेस पात्र आहेत, तसा उल्लेख कर्जमाफीच्या यादीत असल्याचे त्यांनी लिहले आणी तरी देखील अद्यापही या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसल्याने त्यांना लाभ मिळावा असे अर्जात विनंतीत केले.
याबाबत माजी वित्त मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी निवेदनाची त्वरीत दखल घेऊन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था चंद्रपुर यांना पत्र देऊन योग्य कामकाज केले जाऊन नियमानुसार शेतकरी यांना न्याय मिळावा विनंतीत केले.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्रामुळे योग्य कार्यवाही होऊन सहकार विभागातर्फे पात्र शेतकरी यांना कर्जमाफीचा लाभ होईल अशी आशा आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!