बोळधा येथील मिश्र रोपवनाची रोजनदारी वन मजुरांनी केली राख रांगोळी* शिवनपायली येथील गावकऱ्यांचा आरोप

बोळधा येथील मिश्र रोपवनाची  रोजनदारी वन मजुरांनी केली राख रांगोळी* शिवनपायली येथील गावकऱ्यांचा आरोप
5 दिवस होऊनही वनविभागाची कुठलीच कारवाई नाही
आगीत जळून खाक झालेल्या मिश्र रोपवणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी 
शिवनपायली येथील नागरिकांची मागणी



शंकरपूर (जगदिश पेंदाम) 
चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या बोळधा येथील वनविभागाचे मिश्र रोपण दि 16 फेब्रुवारी ला जळुन खाक झाले  या रोपवणाला रोजनदारी वनमजुरांनी साईड बोउंडरी जाळण्यासाठी आग लावली आणि या आगीने हवेच्या झुळकीने संपुर्ण रोपवन जळुन खाक झाले आगीला रोखण्याचे खूप अथक प्रयत्न केले गेले त्यांच्या मदतीला काही गावकरी सुद्धा आले परंतु आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे आग आटोक्यात आली नाही स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी  अज्ञात इसमविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती  समोर आली आहे तर शिवनपायली येथील नागरिकांनी ही माहिती खोटी असून ही आग वनविभागाच्या रोजनदारी मजुरांनी बॉर्डर साफ करण्यासाठी लावली होती आणि वाऱ्याच्या झुळकीने संपूर्ण रोपवन आगीच्या कवेत आले व  जळुन खाक झाले असा आरोप शिवनपायली येथील नागरिकांनी केला आहे 5 दिवस होऊनही वनविभागाने अजुनपर्यंत कुठलीच कारवाई केली नाही  तेव्हा या गँभिर बाबीची योग्यरित्या चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवनपायली येथील नागरिकांनी केली आहे  
             सण 2019 ला वनविभाग ब्रम्हपुरी अंतर्गत, वनपरिक्षेत्र तळोधी(प्रादेशिक), उपक्षेत्र , नेरी निमक्षेत्र बोळधा  कक्ष क्र 424 येथे राज्य योजना अंतर्गत वनीकरण भरगच्च कार्यक्रम राबविण्यात येऊन मिश्र रोपवन पावसाळ्यात 20 हेक्टर जागेमध्ये लावण्यात आले होते    या रोपवणात एकूण 22 हजार अनेक प्रजातीचे रोपे लावण्यात आले होते   
               या रोपवणावर शासनाने मागील दोन वर्षात अंदाजे करोडो रुपये खर्च करून मिश्र प्रकारचा सुंदर रोपवन तयार केले होते अनेक प्रकारचे झाडे तयार होऊन सुंदर रोपवन तयार झाले होते परंतु वनमजुरांच्या निष्काळजीपणा मूळे शासनाचे करोडो रुपयाचे क्षणात नुकसान झाले असा आरोप शिवनपायली येथीनागरिकांनी केला आहे 
     रोपवना ला लागलेल्या आगीत कोण दोषी आहे याची वन विभागाने तात्काळ चौकशी करून सबंधितावर कारवाई करावी अशी मागणी शिवनपायली आणि परिसरातील गावकऱ्यांनी  नागरिकांनी केली आहे
----------------------/-----------------------
प्रतिक्रिया


मी शेतात रोपवनाजवळ बैल चारीत असताना वन मजुरांनी साईड व बाउडरी चे गवत पेटवले त्यामुळे ही आग लागली सर्व रोपवन जळुन खाक झाले तेव्हा दोषींवर कडक कारवाई वनविभागाने करावी 
वामन बोरकर ग्रामस्थ शिवनपायली
-----------------   -----------     -----------
रोपवणात उच असलेला गवत कचरा जळला परंतु ब्रिडिंग केल्यामुळे रोप जळले नाही या घटनेची योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल

खोब्रागडे साहेब
क्षेत्र सहायक नेरी..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!