ती मिरची जाते दिल्लीला 16 एकर मध्ये 1करोड रुपयांच उत्पादन....



 
शंकरपुर (जगदीश पेंदाम)     
 शेतकऱ्यांची सध्या दैन्यावस्था आहे  पारंपरिक पिके घेऊन उत्पादन क्षमता कमी झाल्याने शेतकऱ्यांना शेती परवडत नाही परंतु शेतपिकाचे बाजार भाव मूल्य ओळखून येथील एका शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने मिरचीचे उत्पादन घेऊन प्रगती साधली आहे आणि ती मिरचीला दिल्ली येथे रवाना होत आहे...                             

यशोगाथा आहे शंकरपुर पासून जवळच असलेल्या बोरगाव येथील मनिराम वैद्य या 55 वर्षीय  शेतकऱ्याची बावीस एकर त्यांची शेती हे  शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत होते परंतु पाहिजे तसा लाभ या शेतीतून त्यांना भेटत नव्हता त्यामुळे त्यांना शेती विकावे की ठेवावे हा मोठा गंभीर प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर होता परंतु यांचा मुलगा राजू वैद्य शंकरपूर येथे कृषी केंद्र चालवितात  स्वतः कृषी पदवीधर आहे त्यांनी बाजार भाव बघितला हिरवी मिरची ला चांगला बाजार भाव मिळत आहे आणि मागणी भरपूर आहे याच धर्तीवर त्यांनी तीन वर्षे आधी फक्त पाच एकर मध्ये मिरचीचे उत्पादन घेतले या पाच एकरात त्यांना मिरची उत्पादनातून खूप नफा झाला मिरची पिकाखालील जमीन वाढविली आणि आज तब्बल 16 एकर मध्ये त्यांनी मिरचीचे उत्पादन घेतले आहे आणि त्यातून 70 लाख वर रुपयांची मीरची विकली आहे अजून तीस ते चाळीस लाख रुपयांची मिरचीचे उत्पादन होणार आहे ही मिरची तोडण्यासाठी परिसरातील 25 किलोमीटरच्या शेतमजुरांना कांम मिळालेला आहे रोज त्यांच्या शेतावर 350 ते 400 मजूर काम करीत आहे  त्यांची ही मिरची दिल्ली येथील व्यापारी घेऊन जात आहे त्यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फायदा होत आहे त्यांची ही यशोगाथा पाहून परिसरातील ईतर गावातील शेतकरी साठगाव, आंबोली, चिचाळा, जवराबोडी, कोलारी येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरची उत्पादन घेत आहे... 
आज बाहेर तालुक्यातील पवनी ग्रामीण भागातील महिला मजूर मिरची तोडणी करता येत असून आजच्या परिस्थिती मध्ये हजार-बाराशे महिला मजुरांना काम मिळाले आहे आणि त्यांची मिरची या शेतकऱ्याच्या मार्फत  दिल्लीला जात आहे ..
याबाबत शेतकरी राजू वैद्य बोलताना म्हणाले की शेती पिकाला जो बाजार भाव येतो त्याचा जर अभ्यास केला आणि त्यानुसार जर पिकाची लागवड केली तर शेतकऱ्यांना चांगलं बाजार भाव मिळते  आणि आधुनिक पद्धतीने शेती केली त्यात  पाण्याचं योग्य व्यवस्थापन खताचा योग्य वापर आणि सूक्ष्म नियोजन जर केल तर उत्पादन क्षमता वाढते परिणामी शेतकऱ्यांना लाभ मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने सूक्ष्म निरीक्षण योग्य नियोजन करावे   असा सल्ला इतर शेतकऱ्यांना दिला...
शेतकऱ्यांनी लागवड केलेली मिरची पिके रोशनी, 10...41, आमिषा,एके47 , नंदिता,सूरज..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!