रोजचीच - सरण , रोजचेच - मरण
कविता
यश कायरकर
रोजचीच -सरण , रोजचेच -मरण !
इथे चौकाचौकांमध्ये धधकतांना,
मानवतेच्या चिता...
- ह्या डोळ्या पाहिला मी!
घरोघरी 'सीता' दिसते रडतांना
गल्लोगल्ली रावनांचा तिला,
कळप दिसे फिरताना !
मात्र रस्त्यावरही निर्वस्त्र होतांना,
- इथे नव युगाच्या 'द्रोपद्य़ा' ही पाहिल्या मी !
आधी जात होत्या सती,
अशा पतिव्रता होत्या !
अनैतिकतेत स्वतःचे पती मारतांना,
-इथे नव्या-युगाच्या 'अनुसया' ही पाहिल्या मी !
तेव्हा व्हायचे आई-वडिलांसाठी युद्ध,
भर रस्त्यावर आत्ता फेकले जातात वृध्द !
पैशासाठी बापाचा गळा आवरतांना,
- इथे नव्या युगाचा 'श्रावणबाळ' ही पाहीला मी!
दगड - धोंड्यांसाठी लढ़ताता लोक,
दगड तोडला म्हणून घर तोडतात लोक !
गुरा-ढोरांसाठी मरता-मारतात लोक,
गुरांचा मास शिजविला म्हणून ,
परिवारासोबत मानसांनाच जाळतात लोक !
-इथे माणसांना-'माणुसकी' विकतांना पाहिली मी !
बाबा यांचे - बापू त्यांचे
अल्ला, ईश्वर, येशूला वाटतात धर्मासाठी !
निळा यांचा हिरवा त्यांचा ,
तिरंगा विसरून...
भगवा आणि पिवळ्या रंगा साठी
गटारात भरभरून वाहतांना
- इथे 'लाल' रंग 'रक्ताचा' ही पाहिला मी !
पाण्याचे प्रश्न ? विजेचे प्रश्न ?
शेतकऱ्यांचे प्रश्न ? मजुरांचे प्रश्न ?
आतंकवाद-क्षेत्रवाद विसरून,
जातीयवाद-भाषावादाच्या नावाखाली,
संसदेपासून पंचायती पर्यंत देश विकतांना
- इथे 'राष्ट्र-भ्रष्टांना' पाहिले मी !
अश्या विद्रोही युगात,
ढसा-ढसा रडताना,
तिळा-तिळा तुटताना ...
माझ्या लाडक्या 'मातृभूमीला'
शरमेने .....
रोज-रोज मरताना पाहिले मी !
रोज-रोज मरताना पाहिले मी !
- यश यशवंत कायरकर,
- सावरगाव .
ता. नागभीड , जि.चंद्रपूर
(44 12 21)
मो. 98 81 82 30 83.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!