नागभीड तालुका पत्रकार संघ नागभीड तर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न




नागभीड (प्रतिनिधी) 
नागभीड तालुका पत्रकार संघ नागभीडच्या  वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ दिनांक 31 जानेवारी 2001 ला अवॉर्ड सभागृह नागभीड येथे संपन्न झाला. 
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी महाविद्यालय नागभीड चे  प्राचार्य  डॉ. अनिल कोरपेनवार हे होते. तर, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे, नगर परिषद नागभीडचे गटनेता/नगरसेवक दिनेश पंजाबराव गावंडे,  गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे सिनेट सदस्य अजयजी काबरा, सामाजिक कार्यकर्त्या इंदुताई राजेश्वरजी आंबोरकर व नागभीड तालुका पत्रकार संघ नागभीडचे अध्यक्ष  अॅड. शाम पाथोडे यांची  उपस्थित होती.  
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित पाहुण्यांचे हस्ते  मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशाश्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच्या पुजनाने, दीप प्रज्वलन व  पुष्पहार अर्पण करून  करण्यात आली.  या कार्यक्रमामध्ये  नागभीड  शहरातील दहावी व बारावीच्या परीक्षेत शाळा/कॉलेज मधून  प्रथम व द्वितीय क्रमांकाचे प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत   विद्यार्थ्यांना  गौरवचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुछ देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात इयत्ता 10 मधील  शिवानी सखाराम धकाते, उन्नती अनिल बहेकर, श्रेया रवींद्र वाकडे, साहिल सिद्धार्थ शेंडे, पल्लवी भगवान चिलबुले, भुमिता रमेश भोयर, चेतना विजय चिलबुले, आयेस्मा इकबाल कारिया, प्राची मदन म्हरस्कोल्हे, कृतिका प्रमोद फुंडे आणि वर्ग 12 वी मध्ये प्रथम व द्वितीय ठरलेले विद्यार्थी  जानव्ही  सुभाष भांडारकर, यश  निलेश खोब्रागडे,  आकाश माणिकराव मसराम, गायत्री बाळकृष्ण सहारे, प्रकाश रामदास चौधरी, विवेक रमेश बोरकर, स्वप्निल  तुकडुदास  श्रीरामे, निकिता चंद्रहास गुरपुडे,  प्रज्वल राजेंद्र निशाने, ऋतुजा वसंत रामटेके, रूपाली पुरुषोत्तम दडमल, गंगा रमेश दिघोरे या विद्यार्थ्यांचा सत्कार करून गौरविण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार  हरिभाऊ गरफडे यांनी बाळशाश्त्री जांभेकर यांचे जीवनावर प्रकाश टाकला व उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.  शाम पाथोडे यांनी केले. त्यांनी नागभीड तालुका पत्रकार संघ हा सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी दहावी-बारावीच्या गुणवंत  विद्यार्थ्यांसाठी  सत्कार समारंभ आयोजित करीत असतो असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर  मेहनत केली पाहिजे, मेहनत केली तरच  अपेक्षित  सर्वकाही प्राप्त करता येते, वर्तमानपत्राचे वाचन केल्यास दैनंदिन जीवनात अनेक गोष्ठी प्राप्त होतात असा मौलिक संदेश जी. प. सदस्य संजय गजपुरे यांनी यावेळी  बोलतांना दिला.  अन्य प्रमुख अतिथींनीसुद्धा यावेळी समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ पत्रकार मनोहर मेश्राम यांनी केले. तर आभार प्रदर्शन गुणवंत वैद्य यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागभीड तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!