शेतपिकाच्या संरक्षण साठी लावलेल्या विद्युत करंट ने शेतमजुराचा मृत्यू चिंचाळा कूणबी येथील घटना......
शंकरपूर (जगदीश पेंदाम)
येथून जवळच असलेल्या चिंचाला कुणबी येथे शेतात लावून असलेल्या विद्युत करंटनी शेतमजुर नामदेव चौधरी वय 33 यांचास मृत्यू झाला आहे ही घटना गुरुवार ला सकाळी उघडकीस आली आहे मधुकर चौधरी यांच्या शेतीचा कामावर नामदेव पुंडलिक चौधरी हा गडी माणूस म्हणून काम करीत होता शेतात मिरची व चणा हे पीक घेत असून रानटी डुक्करा पासून संरक्षण मिळावे यासाठी ताराच्या साहाय्याने विद्युत करंट सोडला होता गुरुवार ला सकाळी त्या ताराला स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला त्याच्या मागे सहा वर्षाचा मुलगा तीन वर्षाची मुलगी आई व पत्नी असा परिवार आहे..
भिसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनोज गभने यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी चिमूर येथील ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले आहे विद्युत वितरण कंपनी शाखा अभियंता आमोद रंदये यांनी पंचनामा केला आहे..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!