प्रहार सेवक विनोद उमरे यांनी चिमूर ते माकोना पूर्व बस सेवा सुरु करण्याबाबत बस आगार प्रमुख यांना दिले निवेदन

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - चिमूर ते माकोना पूर्व बस सेवा सुरु करण्यात यावी सावरी परिसरातील ५० विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी बोथली येते दररोज ये जा करीत असतात.सावरी ते बोथली हे ५ किलोमीटरचे विद्यार्थी प्रवास सायकलने करतात तरी विद्यार्थी प्रवास करताना जंगली प्राण्यांचा सामना करावा लागतो व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे या परिसरात वन्यप्राणी वावर जास्त प्रमाणात दिसून येते या परिसरात वाघ, अस्वल डुकर या परिसरात नेहमी धुमाकूळ असतो. तरी विद्यार्थ्यांसाठी  चिमूर ते माकोना पूर्व बस सेवा सुरु करण्यासाठी बस आगार प्रमुख यांना देण्यात आले निवेदन त्यावेळी उपस्थित प्रहार सेवक विनोद उमरे, प्रहार सेवक, स्वप्नील खोब्रागडे, प्रहार सेवक लोकेश मंगरे, सचिन घानोडे, नारायणन निखाडे, मुरलीधर रामटेके, संदीप निखाडे ,नारायणन मत्ते यांनी निवेदन दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!