एस.एम.एस कंपनी,कोठारी आणि लक्ष्मण घाडगे ठेकेदार करीत आहेत चिमूर तालूक्यात अवैध मुरुमाचे उत्खनन

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमुर तालूक्यामध्ये एस.एम.एस कंपनी,कोठारी आणि लक्ष्मण घाडगे या ठेकेदार आणि कंपनी द्वारे अवैध मुरमाचे उत्खनन दैनंदिन मोठ्या प्रमाणावर होत आहे.यांना पुर्णपणे सहकार्य महसुल विभागा कडून मिळत आहे. म्हणूनच यांची हिम्मत चार पटीने वाढलेली आहे.मुरमाचे उत्खनन हे नियम बाह्य होत असून १०० ब्रास लीज ची परवानगी असताना ५०० ब्रास मुरूमाचे उत्खनन करीत असतात.अश्या प्रकारे चिमूर तालूक्यात ठेकेदार व कंपनी यांचे संगम मताने मुरमाचे उत्खनन जोरदार सुरु आहे.ज्या ठिकानी उत्खनन  करतात ते पुर्ण पणे नियम बाह्य  असतात. नियमाने एक मिटर खोलीकरन करायचे असतात पण त्याच जागेवर चार ते पाच मिटर चे मोठ - मोठे खड्डे करून उत्खनन करीत असतात.असेच जांभुळघाट ते खापरी रोड वर तुकाराम बंसोड या शेतकऱ्याच्या शेतामध्ये मोठ मोठे खड्डे व डांबर रोड ला लागूनच मोठे खड्डे करण्यात आले आहे.ते पुर्णपने नियम बाह्य केले आहे.नियमाने कोणत्याही रोड वरून  ५० मिटर सोडून उत्खन करायचे असते. पण हे नियम खिश्यात ठेऊन नियम बाह्य उत्खनन मुरमाचे ठेकेदार व कंपनी चिमुर तालूक्यात करीत आहे. या नियम बाह्य खड्ड्या मुळे बरेचश्या जागी जिवित हानी झाली आहे व समोर सुध्दा या खड्या मुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या प्रकार चे उत्खनन करणाऱ्या कंत्राटदारावर कायदेशीर कार्यवाही करून फौजदारी गुन्हे नोंद करण्यात यावे अशी चिमुर तालुक्याती जनतेकडून मांगणी सध्या जोर धरू लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!