भिसी नगर पंचायतसाठी ग्राम पंचायत निवडणुकीतुन ६६ पैकी ६५ उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

मनोज फागो गेडाम यांचा एकमेव अर्ज कायमच 

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - चिमूर तालुक्यातील भिसी नगर पंचायत निर्मितीची २९ डिसेंबरला उद्घघोषणा प्रसिद्ध झाल्यानंतर भिसी ग्राम पंचायत निवडणूकीत ६६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले पण ३ जानेवारीच्या बैठकीत फार्म मागे घेणार असल्याचा ठराव सर्वपक्षिय बैठकीमध्ये घेण्यात आला होता तेंव्हा आज सोमवारी ४ जानेवारीला तहसील कार्यालय चिमूर येथे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ६६पैकी ६५उमेदवार यांनी नगरपपंचायत निर्मिती साठी निवडणुकीच्या प्रकियेतून माघार घेतली पण एक उमेदवार मनोज फागो गेडाम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नसल्याने थोडी डोकेदुखी वाढली दिसून येत आहे. मागील अनेक वर्षांपासून भिसी नगर पंचायत निर्माण व्हावी म्हणून प्रशासन दरबारी प्रयत्न सुरू होते शासनातर्फे २९ डिसेंबरला शासण निर्णय प्रमाणे उद्धघोषना प्रसिद्ध करण्यात आली दरम्यानच्या काळात गावातील विविध गटनेत्यांनी व अपक्षांनी आप – आपले नामांकन अर्ज दाखल केले.गावातिल ७ प्रभागासाठी १७जागेकरिता विविध पक्षांतील तसेच अपक्ष उमेदवार असे एकूण ६६ उमेदवारांनी ग्राम पंचायत निवडणूकीकरीता उमेदवारी अर्ज भरले असतांनाच मध्येच भिसी नगर पंचायतची अधिसूचना शासनाकडून जाहीर होताच नगर पंचायत कि ग्राम पंचायत या संभ्रमाअवस्थेत उमेदवार आणि गावकरी पडले.त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी व गावविकासाकरीता एकत्र येण्याच्या द्रूष्ट्रीकोनातून भिसी येथील पत्रकार संघटना व टायगर ग्रूप यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक सर्वदलिय गटनेते गावातील स्रूजाण नागरीक आनि अपक्ष उमेदवार यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. सर्वपक्षिय बैठकीमध्ये गरीबा निमजे, धनराज मुंगले ,सौ.ममता डूकरे जि.प.सदस्य , अरविंद रेवतकर ,प्रदिप कामडी, प.स.घनश्याम डूकरे, सचिन गाडीवार, गोपिनाथ ठोंबरे, आनंद भिमटे, सिध्दार्थ चंहादे,उमेश बोमेवार,नारायण पाटील, ईश्र्वर डूकरे , किशोर मुंगले, आणि इतर सर्व पक्षिय कार्यकर्ते,अपक्ष उमेदवार पत्रकार,व गावकरी या बैठकीला हजर होते .
सर्व पक्षिय बैठकीमध्ये विविध पक्षिय गटनेत्यांनी तसेच अपक्ष उमेदवारांनी गावविकासाच्या हितासाठी एकत्र येण्याचे अभिवचन दिले. तसेच ग्राम पंचायत निवडणूकीकरीता भरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची हमी सर्व पक्षिय गटनेत्यांनी दिली . त्यामुळे आज ४जानेवारीला सर्व पक्षिय व अपक्ष उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेणार असे ठरले त्यामुळे तहसील कार्यालय चिमूर येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कडे ६६ उमेदवारां पैकी ६५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याचे अर्ज दिला आहे पण एकमेव उमेदवार मनोज फागो गेडाम हा प्रभाग ३ मधून सर्वसाधारण जागेत अर्ज कायम असल्याने भिसी ग्राम पंचायतच्या होणाऱ्या निवडणूकीवर एकप्रकारे बहिष्कारच टाकण्याच्या प्रकियेतून दूर राहिले आहे असे दिसून येते . भिसी नगरपंचायत संघर्ष समिती काय भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!