जुन्या वस्तीमधील रस्ताच्या बांधकामाला सुरवात

जुन्या वस्तीमधील रस्ताच्या बांधकामाला सुरवात

नगरपरीषदेचे उपाध्यक्ष 
नंदकिशोर रणदिवे यांच्या प्रयत्नांना यश.
मूल प्रतिनिधी* 
प्रमोद म्हशाखेञी*  :—  शहरातील विश्रामगृह ते खान च्या घरापर्यंत  जाणा—या अंतर्गत रस्ताच्या बांधकामाला सुरवात करण्यात आली .  गत ववर्षांपासून या रस्ताची दैयनीय अवस्था झाली होती. आता ह्या रस्त्याच्या बांधकामाला सुरवात झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
शहरातील विविध वार्डतील नाल्या,रस्ते बांधकाम विकास निधी अंतर्गत होत असलेल्या पैकी जुन्या वस्तीतील रस्ताचा कामाचा  दिनांक ४ जानेवारीला नगरपरीषदचे उपाध्यक्ष रणदिवे यांच्या हस्ते नारळ फोडून रस्त्याच्या बांधकामाला सुरवात  करण्यात आली.त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
 रस्त्याच्या बांधकामाला सुरवात होताच वार्डातील नागरिकांच्या चेह—यावर  आनंद दिसून येत होता. आजपर्यंत हया रोडच्या समस्येकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीने  लक्ष दिलेले नव्हते परंतु नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांनी वार्डातील समस्यांकडे जातीने लक्ष देऊन समस्या मार्गी लावल्या. त्यामुळे वार्डातील नागरिकांनी नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांचे आभार मानले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!