सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

आमचा जांभुळघाट ग्रुप आयोजित घे भरारी आकाशात एक दिवसीय स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन शिबीर संपन्न

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - आमचा जांभुळघाट ग्रुप आयोजित घे भरारी आकाशात एक दिवसीय मार्गदर्शन शिबीर जांभुळघाट येथे मधूवन विद्यालय जांभुळघाट येथे घेण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य उद्देश ज्या महामानवांनी आपल्या साठी आपल संपूर्ण आयुष्य न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला व एक क्रांती घडवून आणली त्या महामानवांच्या  कार्याचे ऋण आपण फेडायला पाहिजे या अपेक्षेतून तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी हा आजच्या स्पर्धेच्या युगात यायला पाहिजे या हेतूने हा कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे हिरेंद्र वाळके सर, तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ उपाध्यक्ष मा.प्रदीपजी रामटेके,सामाजिक कार्यकर्ते एकनाथजी गोंगले तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे चिमूर तालुकाध्यक्ष केवलसिंग जुनी प्रामुख्याने उपस्थित होते.हिरेंद्र वाळके सरांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व व त्यात असणारी संधी आणि संधीच्या शोधत असताना येणाऱ्या समस्याना कसे समोर जायचे यावर प्रामुख्याने मार्गदर्शन केले. तर प्रदीपजी रामटेके साहेबांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.व ज्वलंत प्रश्नावर विद्यार्थ्यांशी आपल्या भाषनांद्वारे संवाद साधला व विदयार्थी जीवन कसे असायला पाहिजे यावर सखोल अस मार्गदर्शन केलेे.तसेच सामाजिक कार्यकर्ते एकनाथजी गोंगले यांनी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त शुभेच्छा देवुन सावित्रीबाई फुले यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांना कस सामोरे जावे लागले व तेथून आपण काय शिकायला पाहिजे हे समजावून सांगितले तसेच  विद्यार्थ्यांना आपला विकास साधायचा असेल तर महामानवांची ग्रंथ वाचायला पाहिजे असं संदेश दिला.कार्यक्रमाला  शेवटी आमचा जांभुळघाट ग्रुप चे मुख्य आयोजक ओंकार कोवे,धनंजय टेकाम, अपेक्षा वासनिक, हुकमतसिंग जुनी आणि संपुर्ण आमचा जांभुळघाट ग्रुप परिवार यांच्या वतीने ओंकार कोवे नि सर्व पाहुण्यांचा तसेच गावकरी,विदयार्थी,शाळेचे मुख्याध्यापक या सर्वांच आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!