शहरातील नागरिकांवर लादलेली ही आर्थिक लूट अन्यायकारक – राजू झोडे नगरपालिकेने उपयोगिता कर तात्काळ रद्द करण्याची केली मागणी
शहरातील नागरिकांवर लादलेली ही आर्थिक लूट अन्यायकारक – राजू झोडे
बल्लारपुर :(धनंजय पांढरे)
घनकचरा व सफ़ाई ठेकेदारचे खीसे भरनारा कर म्हणजे उपयोगिता कर
बल्लारपूर नगरपालिकेने उपयोगिता कराच्या नावाने शहरातील नागरिकांवर लादलेली ही आर्थिक लूट अन्यायकारक आहे. बल्लारपुरातील नागरिकांकडून विविध प्रकारच्या कराच्या आकारणीतून आधीच नगरपालिकेने मोठ्या प्रमाणात कर वसूल करण्याचे काम केलेले आहे. यामध्ये पाणी कर, वीज कर, वृक्ष कर, सफाई कर, शिक्षण कर, अतिरिक्त समायोजन कर, असे विविध कर आकारले आहेत. परंतु चालू वित्तीय वर्षापासून उपयोगिता कराच्या नावाने नगरपालिकेने येथील नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड लादलेला आहे. ही बाब अतिशय गंभीर असून अन्यायकारक आहे असा आरोप उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी केला.
घनकचरा व्यवस्थापनातून खत, प्लास्टिक व अन्य विकाऊ सामग्री विक्री केल्या जाते. यातून नगरपालिकेला मिळणारा नफा व कराच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक उत्पन्न यामधूनच कंत्राटदाराला व कामगारांना मोबदला दिला जातो. एकंदरीत दोन्ही बाजूने कंत्राटदाराचा फायदा असताना पुन्हा अतिरिक्त फायदा करुन घेण्याच्या दृष्टीने उपयोगिता करायचा नावाने वसुली केल्या जात आहे. ही बाब अन्यायकारक असून नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
तरी तात्काळ उपयोगिता कराच्या नावाने होणारी वसुली थांबवावी व होणारी आर्थिक लूट बंद करावी करिता संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत मुख्याधिकारी बल्लारपूर यांना निवेदन दिले.जर वरील मागणी तात्काळ पूर्ण झाली नाही तर या विरोधात नगरपालिके समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!