दिल्लीच्या किसान मोर्चासाठी शंभर वाहनांचा ताफा रवाना
ब्रम्हपुरी मधून किसान सभेचे कार्यकर्ते रॅलीत सहभागी
राजुरा - प्रतिनिधी ( रोशन येवले )
राजुरा : - केंद्र सरकारने तीन कृषी विधेयक आणले असून हे शेतकरी विरोधी जाचक काळे कायदे रद्द करण्यात यावेत ,या मागणीसाठी दीड महिन्या पासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते व शेतकरी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून शेकडो गाड्यांनी दी.3 जानेवारी 2021 रोजी नागपूर येथील सविधान चौकात विशाल सभा घेऊन सावनेर मार्गे दिल्ली कडे रवाना झाले आहेत यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी व शिंदे वाही तालुक्यातील कार्यकर्ते सहभागी झालेत.
केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यापूर्वी कृषीचे तीन विधेयक आणले .या विधेयकाला हरियाणा ,पंजाब सह इतर राज्यांच्या शेतकऱ्यानं कडून विरोध होत आहे .कृषी विधेयक रद्द करण्यात यावे मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून भर थंडीत दिल्ली येथे आंदोलन करत आहेत .या आंदोलनाची अद्यापही केंद्र सरकारने दखल घेतली नाही.म्हणून आंदोलन कर्त्याना समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रातून किसान सभेचा शंभर वाहनांचा ताफा दिल्ली कडे रवाना झाला.यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.विनोद झोडगे,किसान सभेचे कार्यकर्ते कॉ.श्रीधर वाढई, आयटक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष वनिता कुंठा वार,नानाजी दांडेकर,तुळशीराम मेश्राम ,उषा बोरकर,रेश्मा कोटरांगे,नानाजी मेश्राम यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!