नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा..!! -चंद्रपूर जिल्हा बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांचे पालकमंत्र्याना निवेदन..!!
नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा..!!
-चंद्रपूर जिल्हा बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांचे पालकमंत्र्याना निवेदन..!!
नागभीड (यश कायरकर)
सुरुवातीला अतिवृष्टी व त्यानंतर आलेल्या मावा तुडतुडा,करपा या सारख्या रोगामुळे व निसर्गाच्या लहरी पणामुळे नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले धानाचे पीक शेतातच नष्ट झाले..काही भागातील जवळपास 80 ते 90 टक्के पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांनी पिकाची कापणी सुद्धा केली नाही.. यामुके शेतकरी आजघडीला आत्महत्येच्या दारात उभा आहे..!!
खाजगी कंपनी च्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून एकरी 350 रुपये प्रमाने पीक विमा काढलेला असून पीक विमा कंपनी चा कुठलाही संवाद सुरुवातीला शेतकऱ्यांना न झाल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले... नागभीड तालुक्यातील आणेवारी सुध्दा पन्नास पैसे पेक्षा कमी असल्याने या पीक विमा योजनेच्या माध्यमातुन लवकरात लवकर विमा मिळावा यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व सहकार नेते गजानन पाथोडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन निवेदन दिले... व लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करावी अशी विनंती केली...!!
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या निवेदनाची दखल घेत लवकरात लवकर जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये विमा कंपनी च्या अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक घेऊन उचित कार्यवाही करून विम्याची रक्कम तातडीने जमा करण्याची विनंती करणार असल्याचे आश्वासन दिले.. तसेच नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या चालू शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी मिळावा यासाठी कॅबिनेट मध्ये लवकरच हा विषय घेणार असल्याचेही पालकमंत्री यांनी आश्वासन दिले..!!!
=======================



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!