वाढोणा येथे लाँग पीच क्रिकेट स्पर्धा संपन्न
सावरगाव (प्रतिनिधी)
नागभीड तालुक्यातील वाढोणा येथे संकल्प क्रीडा व सांस्कृतिक मंडळ वाढोणाच्या वतीने स्व. निखिल भाऊ डोर्लीकर यांच्या स्मूर्थीप्रीत्यर्थ भव्य लाँग पिच क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन विकास डोर्लीकर यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार समितीचे सदस्य डॉ. रघुनाथ बोरकर यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून अशोक लांजेवार, मुर्लीधर बोरकर, टेमदेव लांजेवार, विठ्ठल गजबे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप येसनसुरे ,रामू वाघाडे , गुलाब आत्राम, संजय मदनकर यांची उपस्थिती होती.या स्पर्धेत प्रथम पारितोषिक संकल्प क्रिकेट क्लब वाढोणा यांनी पटकावले तर 'आरएसके' नवरगाव हा संघ उपविजेता ठरला. तसेच तृतीय पारितोषिक आर्यन्स मेंढा (किरमेटी) या संघाने पटकावला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री एकनाथ बंडे सर यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस वितरणाचे अध्यक्ष स्थानी डॉ वि. के. अधिकारी होते.तर संजय डोर्लीकर, प्रकाश कामडी, किशोर नेवारे , बाबुराव येसनसुरे, सामाजिक कार्यकर्ते दिनेशभाऊ पगाडे ,यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संकल्प क्रीडा व सांस्कृतिक मंडळ वाढोणाचे अध्यक्ष शुभम डोर्लीकर,उपाध्यक्ष सचिन बुरबांधें ,सचिव ओकार लांजेवार ,सहसचिव आदित्य बोरकर विकास आत्राम ,नयन भिमनवार ,अभय गजभे,अविनाश वकेकर ,रवी लांजेवार ,मयूर लांजेवार ,पुंडलिक बोरकर,सचिन गहाणे,आकाश कुंभले ,चेतन गजभे आशिष लांजेवार ,गौरव लांजेवार ,बबलू कामडी आदींनी सहकार्य केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!