अवैध फोटोग्राफी व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करा - फोटोग्राफर संघटना

अवैध फोटोग्राफी व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करा - फोटोग्राफर संघटना

मुल : ( सचिन वाकडे) 

               तालुक्यात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाचा आवाहनाला प्रतिसाद देत इतर व्यावसायीकाप्रमाणेच फोटोग्राफी व्यवसाय प्रामुख्याने बंद होता. कालांतराने या संधीचा फायदा घेत अवैधरित्या फोटो काटुन अनाधिकृतपणे प्रिंट काढून देणारे नेटकॉफे, झेराक्स सेंटर, ऑनलाईन सेंटर, रोजगार सेवक, तसेच ग्रामपंचायत मधिल संगणक ऑपरेटर यांचेकडून अधिकचे पैसे घेवून अवैधरीत्या फोटो काढणे सुरु करून ग्राहकांची लुट करीत असल्याचा आरोप मुल तालुका छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष रुपेश कोठारे यांनी केला आहे.
               जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गाचा पार्श्वभुमिवर ६ महिने फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे व्यवसाय बंद होते. केंद्र आणि राज्य शासनाने घोषीत केलेल्या टाळेबंदीचे पालन या व्यावसाईकांनी केले. उन्हाळ्यातील लग्न सराईचा हंगामात हा व्यवसाय बंद होता.
               फोटोग्राफी व्यवसाच्या मिळकतीतून छायाचित्रकारांचा परिवाराचा उदरनिर्वाह चालतो. कोरोना संकटामुळे उपासमारीची वेळ आली आहे. दुकानाचे भाडे देणे कठीण झाले असुन तालुक्यातील सर्व फोटो स्टुडिओ धारकांचे समान दर असतांना झेराक्स सेंटर, नेटकॉफे, ऑनलाईन सेंटर यांनी बेभावपणे ग्राहकांचे फोटो काढून देतात. तसेच शासकिय वेतन घेणारे रोजगार सेवक, ग्रामपंचायतमधील डाटा एन्टी ऑपरेटर यांना शासकिय कामासाठी नियुक्त केले असुन ते ग्राहकांचे फोटो काढून देतात.
               सध्या जॉब कार्डचे फोटो काढणे सुरू असुन असेच प्रकार सुरु राहीले तर आमचा व्यवसाय बंद केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. मोठे भांडवल उभारुन फोटो स्टुडिओ व्यवसाय सुरु केले असल्याने स्टुडिओ व्यवसायावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. ज्या व्यवसायाकरिता नोंदणी केली असेल तोच व्यवसाय करणे बंधनकारक करण्याची मागणी मुलचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर तसेच संवर्ग विकास अधिकारी कपिल कलोडे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
               यावेळी मुल तालुका छायाचित्रकार संघटनेचे सचिव ओमकार माडेकर, महेश भुरसे, प्रवीण चलाख, मिथुन वासेकर, शुभम किर्तीवार, प्रमोद चुदरी, विकास चलाख, लाखन भोयर, श्रीकांत देवगडे, तसेच तालुक्यातील छायाचित्रकार सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!