श्री गुरुदेव सेवा मंडळ उश्राळ मेंन्ढा येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 52 व्या पुण्यतिथी उत्सव सोहळा,

श्री गुरुदेव सेवा मंडळ उश्राळ मेंन्ढा येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हस्ते झाले 
नागभीड (यश कायरकर) 
पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला, या कार्यक्रमा मध्ये भूवैकुंठ आत्मा अनुसंधान अड्याळ टेकडी येथील संचालक आदरणीय *सुबोध दादा,* महिला आश्रमातील सुश्री *रेखाताई बुराडे* , ग्रामपंचायत येथील सरपंच *हेमंतजी लांजेवार,* उपसरपंच *जयेशजी लोन्ढे* , ग्रामसेवक *कापगते सर* पोलीस पाटील *विनोदजी सयाम* , तंटामुक्ती अध्यक्ष *यशवंतजी लोंढे,* माजी तंटामुक्ती अध्यक्ष *रामदाजी तोडासे,* *प्रकाश पाटील बोरकर* , *धनपालजी बोरकर सर* , *देवानंदजी डोर्लीकर,* आणि गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. सकाळी सात वाजता रामधून काढण्यात आली. रामधुन मध्ये संपूर्ण गावांमधून रामधून काढण्यात आली, रामधून मध्ये सर्व ग्रामस्थ उपस्थित होते, पुण्यतिथी च्या माध्यमातून आणि सुबोध दादाच्या मार्गदर्शनातून अनेकांनी व्यसनमुक्तीवर संकल्प केला सामुदायिक प्रार्थनेत येणार असे काही संकल्प केले, काही लोकांनी संकल्प न करता ते गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्याला जोडले, असे *मंगेशजी बोरकर* यांनी आज ग्रामगीता वाचून सामुदायिक प्रार्थनेत येण्याचा निश्चय केला, काही महिला येत्या सोमवार पासून सामुदायिक प्रार्थनेत येणार असे संकल्प केले, आदर्श सेवा साधन्या. कर सामुदायिक प्रार्थना. हा विचार वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा. प्रत्येक जण माणसात पोहोचला .आणि या गावची पुण्यतिथी 52 वी सर्वांच्या सहकार्याने संपन्न झाली... जय गुरूदेव🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!