महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे बल्लारपूर, राजुरा,कोरपना तालुका निरीक्षक सुभाष बुजोने यांचे हृदयाघातात ने निधन
बल्लारपूर (वसंत मुन)
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे बल्लारपूर, राजुरा व कोरपना तालुका निरीक्षक व जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुभाष बुजोने यांचे आज सकाळी 11:00 वाजताच्या सुमारास बल्लारपूर-राजुरा रामनगर महामार्गावर हृदयाघातात अपघातात निधन झाले सूत्राच्या माहिती नुसार श्री. सुभाष बुजोने आपल्या वैयक्तिक कामाच्या निमित्ताने राजुरा येथे जात असतांना अपघात घडल्याची माहिती असून त्यांचे जागीच निधन झाल्याचे वृत्त आहे
त्यांच्या या अकाली निधनाने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा बल्लारपूर ची अपरिमित हानी झाली असून संपूर्ण संघ या दुःखात सहभागी आहे मिळालेल्या माहितीनुसार स्व. सुभाष बुजोने यांच्यावर 23 जानेवारी 2021 ला बल्लारपूर येथे सकाळी 10:00 वाजता अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!