राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दाखविले काळे झंडे दल भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे यांचा नेतृत्वाखाली काळे बॅनर दाखवून आंदोलन करण्यात आले.



बल्लारपुर:-(प्रतिनिधी)

चंद्रपूर जिल्हा चा दौऱ्यावर आलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना बल्लारपुर येथील भारतीय जनता युवा मोर्चा चे कार्यकर्तानी पोलीस प्रशाशन विरुद्धजिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, पत्रकारावर वाढते हल्ले, महिलांवरील अत्याचार,अवैध दारू विक्री, या सर्व बाबीवर अंकुश लावण्यात अपयश ठरत असल्याने भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे यांचा नेतृत्वाखाली काळे बैनरदाखवून आंदोलन करण्यात आले. गृहमंत्री चा काफीला नवीन बसस्थानक जवळ येताच युवा मोर्चा चे कार्यकर्ता आपल्या खिशात ठेवलेले बैनर काढून दाखविले बैनर मध्ये जिल्ह्यातील अवैध दारू ,पत्रकार वर होणारे हल्ले, वाढती गुन्हेगारी आदी बैनर लिहलेले मजकूर दाखविले.भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांचा नेतृत्वाखाली ओम पवार, सचिन डोहे, प्रतीक बरसागडे, रिंकू गुप्ता, मोहित डंगोरे,संजय वाजपेयी, श्रीकांत उपाध्याय, आदित्य शिंगाडे, निलेश कटारे, कुणाल श्रीरसागार,अदनान शेख, प्रचलित धंदरे,सिराज शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!