स्वाब नेचर केअर संस्था' ने राबविले पेरजागड़(सात बहिणी) डोंगर परिसर स्वच्छता अभियान


    जंगलातील तलाव, पर्यटन स्थळे, निसर्ग रम्य स्थळे, प्लास्टिक मुक्तीचा धेय्य.
     साप्ताहिक राबविले जाते परिसरात स्वच्छता अभियान.
     
नागभीड (प्रतिनिधी ) 
आज दि.17/01/21रविवार ... *स्वाब नेचर केअर संस्था'* द्वारे आज पेरजागड़ (सात बहिणी) डोंगर आणि डोंगर परिसरातील प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, पत्रावळी, प्लास्टिक कचरा गोळा करून जाळून निसर्ग परिसर स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ व प्रदुषणमुक्त केला. हा अभियान परिसरातील तलाव, पर्यटन स्थळे, निसर्ग रम्य स्थळे साप्ताहिक पाळी ने स्वच्छ व प्रदुषणमुक्त करन्याचे अभियान  'स्वाब नेचर केअर संस्था' सातत्याने राबवित आहे. त्याच परिसर स्वच्छता अभियान अंतर्गत  स्वच्छता अभियान राबवून पेरजगड परिसर आज प्लास्टिक कचरा मुक्त करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक/ अध्यक्ष श्री यशवंत कायरकर, सदस्य - सचिन निकुरे, विकास बोरकर, हितेश मुंगमोडे, वेदप्रकाश मेश्राम, महेश बोरकर, प्रतीकार बोरकर,  प्रशांत सहारे, श्रेयस कायरकर, वन विभागाचे श्री.एस.एस. गौरकर, वनरक्षक येनुली (माल), व एस. जुमनाके मॅडम, वनरक्षक सरांगड हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!