हल्दी कुंकु कार्यक्रम संपन्न

हल्दी कुंकु कार्यक्रम संपन्न


मूल (कुमुदिनी भोयर )

मूल शहरातील जिजाऊ महिला बचत गट कुणबी मोहला वार्ड नं. 5 येथिल महिलांनी उत्साह दाखवित हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला. सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडला. यावेळी एकल नृत्य, समूह नृत्य महिलांनी तसेच मुलींनी साजरे केले.

या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मूल नगर परिषदेच्या अध्यक्षा रत्नमाला भोयर होते. उदघाटक मूल नगर परिषदेच्या नगरसेविका प्रभाताई चौथाले,  प्रमुख पाहुणे म्हणून संजीवनी वाघरे, विद्या बोबाटे,  कोटगले, सुधा चरडुके , नरुले ताई , कोरडे, माया चौकुंडे, शोभाबाई चिताडे, पुष्पा चिताडे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संचालन जया भुरसे तर  आभार स्नेहा भुरसे यांनी मानले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिजाऊ ब्रिगट महिला बचत गट तसेच महिलांनी प्रयत्न केले. यावेळी कुणबी समाजाच्या महिला, युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!