पिपंळनेरी येथे जनावरांना दिली प्रतिबंधक लस

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी  १ चिमूर अंतर्गत नगर परिषद हद्दीतील पिपंळनेरी येथे जनावरांना तोंडखुरी व पायखुरी रोगांचे प्रतिबंधक लसीकरन शिबीर सोमवार ला पार पडले.
       पशु सशक्त रहावे व हा आजार पशु ला होवू नये यासाठी प्रतिबंधक लस वर्षातुन दोन वेळा जनावरांना दिल्या जाते पशुधन विकास अधिकारी गट अ डॉ. दिक्षा पाटील यांनी शासनानी दिलेल्या निर्देशानुसार नगर परिषद हद्दीतील पिपंळनेरी येथे सोमवार ला पशु शिबीर आयोजीत करून पशु मालकांच्या घरोघरी जावुन पशुची तपासणी केली व तोंडखुरी, पायखुरी रोगांवर प्रतिबंधक पशुधनाचे  लसीकरण केले. आणि पशु ला ओळखपत्र म्हणून पशुच्या कानाला बिल्ले लावण्यात आले. दरम्यान त्यांच्या ऑन लाईन नोंदी घेन्यात आल्या यावेळी डॉ पाटील यांच्या सहकार्याला खाजगी लसीकरण करणारे किशोर सातपुते व धनराज पाटील उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!