अ.भा.वि.परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या फलकाचे विमोचन करतांना अ.भा.वि.परिषद चे कार्यकर्ते

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - अ.भा.वि.परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन म्हणजे कार्यकर्त्यांसाठी मोठी पर्वणी असते शिवाय अवघ्या शिक्षण क्षेत्रालाही या अधिवेशनाबाबत उत्कटता असते. यावर्षी तब्बल २५ वर्षानंतर नागपूर येथे हे अधिवेशन होत आहे. मात्र कोवीडमुळे ते केवळ ५० जणांचे आहे. तरीही ठिक - ठिकाणी या अधिवेशनाच्या सत्राचा लाभ कार्यकर्ते आणि विध्यार्थी घेऊ शकणार आहेत. अशी सोय ब्रम्हपुरी तसेच तळोधी या ठिकाणी करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा संयोजक प्रविण गिरडकर यांनी कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थ्यांना दिली.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ६६ व्या राष्ट्रीय अधिवेनाच्या पोस्टरचे विमोचन करतांना अ.भा.वि.परिषद नगरात कार्यकारणी अध्यक्ष प्रा. शेंडे सर, ब्रम्हपुरी जिल्हा संयोजक प्रविण गिरडकर, बजरंग दल प्रखंड संयोजक परिमल मदनकर, किर्ती मुदगल, मंथन नागदेवे आणि कार्यकर्त्यांचा हस्ते करण्यात आले. आणि जिल्हात ठिक - ठिकाणी यावेळी पोस्टर लावण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!