सरांडी येथे शेतकरी प्रशिक्षण संपन्न
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्य योजना आज दिनांक 22/12/ 2020 रोज मंगळवारला सकाळी 10 वाजता कृषी विभागांतर्गत शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे-श्री नानाजी गुरनुले (मा. पो.पा.) सरांडी, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री देविदासजी भेंडारे (आदर्श शेतकरी) हे होते, मुख्य मार्गदर्शक- मंडळ कृषी अधिकारी श्री. ए. आर. महाले, श्री आर. एस. धुळे, कृ. स. शिवनी, व्ही एम कुठे, कृ. स. नवरगाव, डी व्ही भानारकर, कृ. स. रत्नापूर यांनी गहू,चना,तुर,भाजीपाला, यासारख्या पिकावर प्राथमिक उपचार, व रोगावरील किड नियंत्रण यासाठी वापरावयाचे कीटनाशकांची माहिती देण्यात आली, मातीपरिक्षण कोणत्या पद्धतीने करायचे ते लोकांच्या समोर करून दाखविण्यात आले,या प्रशिक्षणाला सरांडी गावातील शेतकरी,महिला व युवक बऱ्याच संख्येने हजर होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!