नगर परिषदेत विवीध कामगारांचा सत्कार- सफाई कामगारांची कार्यशाळा संपन्न
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत २०२० - २०२१ करीता शहरातील सफाई व त्याकरीता घ्यायची काळजी या संदर्भात नगर परिषद अधिकारी अधिकारी व कर्मचारी यांनी सफाई कामगार यांची कार्यशाळा शहीद बालाजी रायपूरकर सभागृह येथे पार पडली दरम्यान कोरोणाच्या काळात स्वताचे संरक्षण करून जबाबदारी पार पाडनाऱ्या व नगर परिषदेमध्ये विवीध कामावर असनाऱ्या कामगाराचा कोरोणा योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.
नगरपरिषदेमध्ये विवीध कामावर असनाऱ्या कोरोणा योद्धाचा सत्कार नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधीकारी मंगेश वासेकर यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्य शाळेत शहरात काम करत असताना कोरोणा पासुन संरक्षण कसे करायचे या विषयी अधिक्षक राकेश चौगुले यांनी माहीती दिली. कोरोणात कोणताही आजार होवू नये यासाठी पीपीई किट चा वापर चष्मा हॅन्ड ग्लोज जॉकेट वापरणे किती गरजेचे आहे याविषयी ची माहीती विद्युत अभियंता वैभव बोंदरे यांनी दिली. शहरातील कचऱ्यांची योग्य विल्हेवाट लावन्यासाठी ओला कचरा सुखा कचरा यांचे व्यवस्थापण करून ओला कचरा व सुखा कचरा वेग वेगळा करने व घंटागाडीत टाकणे महत्वाचे आहे याविषयीची माहीती नगर अभियंता ( बांधकाम) राहुल रणदिवे यांनी दिली. दरम्यान नगर परिषद मध्ये कोरोणा काळात कामावर असनारे कामगार ज्यांनी स्वताचे संरक्षण व जबाबदारी समजून काम केले असे सफाई कामगार अरुणा चांदेकर, खत निर्मीती करनाऱ्या रिना सहारे, नाली सफाई करनारे शंकर भानारकर, घंटागाडी चालविनारे तालीम शेख, व नगपरिषद कर्मचारी ममता बघेल, ललीता बेसरे यांचा कोरोणा योद्धा म्हणून गौरव करून सत्कार करन्यात आला.
यावेळी मुख्य लेखापाल आशीष पंदीलवार, संघनक अभियंता योगेश वासनिक, लिपीक शरद पाटील, प्रविण कारेकर आदी उपस्थीत होते. कार्यशाळेला बहुसंख्य कामगार उपस्थीत होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!