प्रहार जनशक्ती पक्ष वरोरा च्या वतीने भारत बंद ला टेमूर्डा येथे जक्का जाम आंदोलन
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी : - दिनांक.०८/१२/२०२० शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी आज भारत बंद चे आयोजन करण्यात आले. शेतकरी बांधव यांचे दिल्ली येथे आंदोलन सुरू असून शेतकरी यांच्या मागणी यशसवी होण्यासाठी आज भारत बंद ठेवून नविन शेतकरी कृषी विधेयक मागें घेण्यात यावे , स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावे, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागें घ्यावे , या सर्व मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष वरोरा तर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित प्रहार सेवक किशोर डुकरे, प्रहार सेवक शेरखान पठान, गणेश भाऊ ऊराडे, अमोल दात्तारकर, मूजमील शेख,व प्रहार जनशक्ती पक्ष वरोरा या चक्का जाम आंदोलनाला सर्व पक्षांनी मिळून पाठींबा देण्यात आला. मनसे चे चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष राजू भाऊ कूकडे व मनसे चे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष राजूरकर साहेब यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. व शेतकरी बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते, किशोर डुकरे , शेरखान पठान, गणेश ऊराडे यानी, आंदोलना ला उपस्थित शेतकरी बांधव यांचे आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!