शेतकरी विरोधी कायद्या विरोधात युवक काँग्रेस व सर्व पक्षीय तर्फे आंदोलन संपन्न

भारत बंद ला चिमूर शहर वासीयांकडून १००% प्रतिसाद

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - दिनांक.८ डिसेंबर २०२० ला शेतकरी कायद्याविरोधात संपूर्ण भारत बंद चे आयोजन करण्यात आले. त्याच निमित्ताने युवक काँग्रेसचे चिमूर विधानसभा अध्यक्ष गौतम पाटील तसेच तालुका अध्यक्ष प्रशांत डवले यांच्या नेतृत्वात शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात भारत बंद आंदोलनाला सर्व चिमूर वासियांचा संपूर्ण प्रतिसाद व कडकडीत बंद पुकारण्यात आला. व संपूर्ण व्यापारी मंडळाने या बंद ला सहकार्य केले.आणि दुकाने बंद ठेवलीत व या आंदोलनात कुठल्याही प्रकारची हानी न होता शांततेत आंदोलन पार पाडण्यात आले.यावेळी चोक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच या आंदोलनात युवक काँग्रेसचे तालुका कार्यकर्ते व आदी पदाधिकारी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!