पळसगांव (पि) येथे प्रज्ञासूर्य डाँ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी त्रिवार अभिवादन
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगांव (पिपर्डा) : - चिमूर तालुक्यातील मौजा पळसगाव ( पि )येथील अखिल भारतीय बौद्ध महासभा व महामाया महिला मंडळ च्या वतीने डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त सायंकाळी भीमगीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धार्मिक म्होस्तव व धार्मिक यावर असलेली बंदी लक्षात घेता भीम अनुययानी कोरोनाचा सर्व नियम पाळून आज दिनांक ६/१२/२०२० ला सायंकाळी ५ वाजता नालंदा बुद्ध विहारामध्ये क्रांती सूर्य महात्मा फुले,माता सावित्रीबाई फुले, तथागत भगवान गौतम बुध्द व डॉ.आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळाल्या पुष्पहार अर्पण करून त्रिवार अभिवादन करण्यात करून .पंचशील ध्वज अर्ध्यावर फडकाऊन ध्वजा रोहण करून बुद्ध वंदना व मौन आदरांजली अर्पण करून्यात आली.या वेळी बौद्ध समाजाचे अद्यक्ष दामोदर रामटेके,सचिव प्रभाकर गजभिये,वणीता भीमटे,सुनीता पाटील,नरेश पाटील,मनोहर मेश्राम,भीष्माचार्य राऊत,प्रदीप गजभिये ,सिद्धार्थ रामटेके,संदीप ढोक,गौतम रामटेके,सचिन भगत,तुलाराम रामटेके,दिलरंजन शेंडे,निलेश गजभिये,शिलवंत पाटील व बौद्ध उपासक उपसिका उपस्थिती होत्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!