१५ जानेवारी रोजी मतदान तर १८ जानेवारीला मतमोजणी

ग्राम पंचायत च्या निवडनूकीसाठी  प्रशासन झाले सज्ज
तहसीलदार  तथा निवडणूक अधिकारी रमेश कोळपे
         
वरोरा - प्रतिनिधी (आलेख रट्टे)

वरोरा : - राज्य निवडणूक आयोगाने ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार वरोरा तालुक्यातील ८१ ग्राम पंचायती पैकी ७८ ग्राम पंचायती मधील ७१६ सदस्य पदाच्या निवडीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून २३ डिसेंबरपासून  उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तालुक्यातील  ७८  ग्रामपंचायतीच्या निवडणुकी घेण्यास प्रशासन सुसज्ज आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार रमेश कोळपे यांनी तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
           कोळपे पुढे म्हणाले की, तालुक्‍यातील दहेगाव,सालोरी व  अर्जूनी ग्राम पंचायत वगळता इतर ७८ ग्राम पंचायतीच्या निवडणूका होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे तेथे प्रशासकाची नियुक्ती करण्याची वेळ आली होती. आता ' कोव्हीड १९ ' चा प्रभाव बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. १४ डिसेंबर रोजी  अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर आता त्यापुढील प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ती यानुसार १) तहसीलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करण्याची तारीख ( १५ डिसेंबर २०२०), २) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात  तारीख २३ डिसेंबर २०२० ( सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून), ३)उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख (३० डिसेंबर २०२० सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत), ४) उमेदवारी अर्जाची छाननी करण्याची तारीख व वेळ (३१ डिसेंबर २०२० सकाळी ११ वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत ), ५) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा तारीख घेण्याची तारीख आणि वेळ ( ४ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत), ६) निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची तारीख व वेळ ( ४ जानेवारी  २०२१ दुपारी ३ वाजता नंतर),  ७) मतदान तारीख १५ जानेवारी २०२१( सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत) ८)  मतमोजणी तारीख १८जानेवारी २०२१, ९) जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक ( २१ जानेवारी २०२१)
         निवडणुकीच्या काळात  एकूण १३ निवडणूक निर्णय अधिकारी, १३  सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, आवश्यक कर्मचारी व पोलीस यांची संख्या जवळपास १५००, ईव्हीएम मशीन २५५  + २०  २७५,  इ.च्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात येईल. निवडणुकीच्या काळात कोरोना संबधिच्या नियमांचे पालन, आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करुन निवडणूक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असे त्यांनी सांगितले.  २०११ च्या जनगणेनेनुसार ७८  ग्राम पंचायतीची लोकसंख्या १ लाख ३९ हजार ३५७ असून मतदार संख्या ९७ हजार ४६६ आहे.  एकूण २४१ प्रभागातून ७१६ उमेदवार उभे राहणार असून यात अनुसूचित जाती पुरुष - ४४, स्त्री - १८, अनुसूचित जमाती पुरुष १५३,  स्त्री - ८७,   इमाप पुरुष - १६४, स्त्री - ८३ व सर्व साधारण गट पुरुष - २५५, स्त्री - १५८  असे एकूण  पुरुष - ३७० व स्त्री- ३४६ चा समावेश आहे. राजकीयदृष्ट्या  संवेदनशील गावात नागरी, माढेळी, वनली, चिकणी, टेंभुर्डा,  खांबाडा, बोर्डा, उखर्डा, खेमजई इ. वडगाव जातीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून  साखराराजा, कोसरसार, चार गाव (बु ), शेगाव( बु.) मतदान केंद्रांचा समावेश होतो. यासाठी चोख बंदोबस्त करण्यात येणार आहे. 
     नामनिर्देशन पत्र  मागविणे, छाननी, चिन्ह वाटप, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्धि  इ. तहसील कार्यालय वरोरा येथे तर मतदान साहित्य वाटप व स्विकारणे, मतमोजणी मोहबाळा मार्गावरील कृषी बाजार समिती येथे होणार असून या सर्व प्रक्रिया  यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे ससज्ज असल्याची माहिती निवडणूक अधिकारी रमेश कोळपे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!